खेळ खल्लास! ऑनलाईन गेममध्ये हरले 5 लाख, पती-पत्नीला आलं टेन्शन, रात्री खोलीत गेले अन्...

Last Updated:

खेडा रामपूर गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. ऑनलाईन जुगारात सुमारे ५ लाख रुपये गमावल्याच्या नैराश्यातून दीपक राठोड आणि त्यांची पत्नी राजेश राठोड यांनी आपल्या...

Online gambling
Online gambling
ऑनलाईन गेममध्ये या दाम्पत्याने जीवन संपवलं. ऑनलाइन जुगारात 5 लाख रुपये गमावले होते, त्यामुळे हे जोडपं नैराश्यात गेलं होतं. सोमवारी सकाळी दीपक राठोड आणि त्यांची पत्नी राजेश राठोड असं या दाम्पत्याचं नाव होते. राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील खेदा रामपूर गावात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. ही घटना 2 जून 2025 रोजी उघडकीस आली, जेव्हा सकाळी दीपकच्या वडिलांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर दरवाजा तोडल्यावर दीपक आणि राजेश दोघेही पंख्याला लटकलेले दिसले.
या घटनेबद्दल उपअधीक्षक (DSP) राजेश ढाका यांनी सांगितलं की, रविवारी रात्री जेवण झाल्यावर या दाम्पत्याने बाजारातून नायलॉनची दोरी विकत घेतली होती आणि त्याच रात्री त्यांनी आत्महत्या केली. खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, पण दीपकच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलं की, त्याने नुकतेच ऑनलाइन जुगारात 5 लाख रुपये गमावले होते आणि त्यामुळे तो खूप तणावात होता. काही दिवसांपूर्वी दीपकने आपल्या पत्नीच्या मोठ्या बहिणीशी फोनवर बोलताना आपल्या अडचणी सांगितल्या होत्या आणि आता जगण्यासाठी कोणताही मार्ग उरला नाही, असंही तो म्हणाला होता.
advertisement
ऑनलाइन जुगाराचा सापळा
या घटनेमुळे ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाचे किती गंभीर परिणाम होतात, हे पुन्हा एकदा समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांत भारतात अनेक लोकांना ऑनलाइन जुगारामुळे मोठं आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आहे. उदाहरणार्थ, 2024 मध्ये तामिळनाडूमध्ये एका 31 वर्षीय व्यक्तीने ऑनलाइन जुगारात 5 लाख रुपये गमावल्यानंतर आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे, 2023 मध्ये कोईम्बतूरमधील एका कार डिलरने ऑनलाइन क्रिकेट बेटिंगमध्ये 90 लाख रुपये गमावल्याने आपलं जीवन संपवलं. ऑनलाइन जुगार, विशेषतः रमी आणि क्रिकेट बेटिंगसारखे खेळ तरुणांमध्ये आणि मध्यमवयीन लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. पण त्याचबरोबर ते आर्थिक आणि मानसिकरित्याही खूप नुकसान करत आहेत.
advertisement
पोलिसांचा तपास सुरू
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दीपकने कोणत्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर जुगार खेळला आणि त्याला कर्ज देणाऱ्यांकडून काही दबाव किंवा धमक्या येत होत्या का, याचा पोलीस शोध घेत आहेत. डीएसपी राजेश ढाका म्हणाले की, पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत आहेत आणि ऑनलाइन जुगाराच्या धोक्यांबद्दल जनजागृती करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
advertisement
भारतात काही राज्यांनी ऑनलाइन जुगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर पाऊले उचलली आहेत. तामिळनाडूने 2023 मध्ये 'तामिळनाडू प्रोहिबिशन ऑफ ऑनलाइन गॅम्बलिंग अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेम्स ॲक्ट' (Tamil Nadu Prohibition of Online Gambling and Regulation of Online Games Act) लागू केला आहे, ज्यात ऑनलाइन जुगार सेवा देणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. मात्र, अशा गुन्हेगारीला रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एका व्यापक कायद्याची अजूनही गरज आहे.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
खेळ खल्लास! ऑनलाईन गेममध्ये हरले 5 लाख, पती-पत्नीला आलं टेन्शन, रात्री खोलीत गेले अन्...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement