बोंबला! सासूबाई 4 सुनांचे दागिने घेऊन 30 वर्षांच्या तरुणासोबत फरार; सासऱ्याची तक्रार ऐकून पोलीस चकित 

Last Updated:

ललितपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जिथे चार विवाहित मुलांची 55 वर्षांची आई एका 30 वर्षांच्या विवाहित तरुणासोबत पळून गेली. ही महिला घरातून...

Love Affair
Love Affair
आपल्या देशात सासू-जावई किंवा सासू-सुनेचं नातं हे आई-मुलाच्या किंवा आई-मुलीच्या नात्यासारखंच पवित्र मानलं जातं. पण उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये मात्र याच्या अगदी उलट घडलं आहे. इथे चार मुलांच्या आईला चक्क एका 30 वर्षांच्या तरुणासोबत प्रेम झालं. प्रेम तर झालं, पण त्यानंतर तिने जे काही केलं, त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. नेमकी काय आहे ही घटना, चला जाणून घेऊया...
55 वर्षांची महिला 30 वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात
खरं तर, ही घटना बुंदेलखंडमधील ललितपूर जिल्ह्यातील जाखोरा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. इथे राहणाऱ्या एका सुमारे 55 वर्षांच्या वृद्ध महिलेला चार विवाहित मुलं आहेत. महिलेच्या पतीने आरोप केला आहे की, त्यांच्या पत्नीचे गेल्या काही महिन्यांपासून एका 30 वर्षांच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. तो तरुण त्याच गावातील असून तो आधीच विवाहित आहे.
advertisement
सुमारे 20 दिवसांपूर्वी ही महिला अचानक घरातून गायब झाली. सुरुवातीला घरच्यांना वाटले की, ती कदाचित कोणत्या नातेवाईकांकडे गेली असेल, पण अनेक दिवस काहीच पत्ता न लागल्याने तिचा शोध सुरू झाला. तेव्हा कळले की ती त्याच गावातील तरुणासोबत पळून गेली आहे.
सुनेचे दागिने घेऊन प्रियकरासोबत पळाली सासूबाई!
या वृद्ध महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, त्याची पत्नी केवळ घरातून पळूनच गेली नाही, तर तिने आपल्या चार सुनांचे दागिनेही सोबत नेले आहेत. यात सोन्याच्या बांगड्या, नेकलेस, कानातले आणि इतर मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे, ज्यांची एकूण किंमत लाखोंमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, घरातील रोख रक्कमही गायब झाल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
advertisement
पोलीस तपासात, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र
पीडित पतीने जाखोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, पण त्यांचा आरोप आहे की पोलिसांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. पोलिसांकडून मदत न मिळाल्याने त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय मिळावा अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिले आहे. याशिवाय, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनाही तक्रार पाठवण्यात आली आहे.
advertisement
आता पोलीस त्या महिला आणि तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. गावात आणि आसपासच्या परिसरात तपास केला जात आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि हॉटेल्सनाही दोघांचे फोटो पाठवले आहेत, पण अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. दरम्यान, ही घटना गावात वेगाने पसरली असून लोक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
बोंबला! सासूबाई 4 सुनांचे दागिने घेऊन 30 वर्षांच्या तरुणासोबत फरार; सासऱ्याची तक्रार ऐकून पोलीस चकित 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement