नाशिक महापालिका सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट! शिंदे गटाच्या खेळीने ठाकरेंना आली मोठी संधी
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Nashik Election 2025 : महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा आणि निर्णायक बदल घडून आला असून, राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
नाशिक : महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये मोठा आणि निर्णायक बदल घडून आला असून, राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान भाजपविरोधात मैदानात उतरलेली शिंदे गटाची शिवसेना आता थेट भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहे. या नव्या युतीनुसार महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिंदे गटाच्या शिवसेनेकडे राहणार आहे. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला पाठिंबा दिल्याने नाशिक महापालिकेत बहुपक्षीय सत्ता स्थापन होणार आहे.
भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-मनसे सत्तेत
नव्या सत्तारचनेनुसार भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे पक्ष सत्तेचा भाग असणार आहेत. या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्तेचे गणित पूर्णतः भाजपच्या बाजूने झुकले आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करणारे हे पक्ष आता एकत्र सत्तेत बसणार आहे.
भाजपचा महापौर, शिवसेनेचा उपमहापौर
सत्तास्थापनेच्या करारानुसार भाजपच्या हिमगौरी आडके या नाशिकच्या महापौरपदी विराजमान होणार आहेत. तर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड होणार आहे.
advertisement
ठाकरे गटाला विरोधी पक्षनेतेपद
नाशिक महापालिकेत सत्तेबाहेर राहिलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संख्याबळाच्या निकषांनुसार ठाकरे गट हा विरोधी बाकांवर सर्वात मोठा पक्ष ठरतो.
निवडणूकीचा निकाल काय?
अलीकडील महापालिका निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ७२ जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले. शिंदे गटाच्या शिवसेनेने २६ जागा जिंकल्या, तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला १५ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला केवळ ३ जागा मिळाल्या असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ४ जागा जिंकल्या आहेत. मनसेला १ जागा मिळाली, तर एका जागेवर अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 10:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिक महापालिका सत्ता स्थापनेत मोठा ट्विस्ट! शिंदे गटाच्या खेळीने ठाकरेंना आली मोठी संधी










