advertisement

पुण्याच्या कॅम्प परिसरात शाळेसमोरच उभी होती 2 अल्पवयीन मुलं, जवळ जाताच समजलं असं कांड की उडाली खळबळ

Last Updated:

कॅम्पमधील प्रसिद्ध एमजी रोडवरील एका नामांकित शाळेसमोर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

दोघांकडून मेफेड्रोन (एमडी) जप्त (AI Image)
दोघांकडून मेफेड्रोन (एमडी) जप्त (AI Image)
पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात ड्रग्जचा विळखा किती खोलवर गेला आहे, याचे एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कॅम्पमधील प्रसिद्ध एमजी रोडवरील एका नामांकित शाळेसमोर गुन्हे शाखेच्या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल २ लाख ६० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे.
गस्तीदरम्यान संशयास्पद हालचाली
गुन्हे शाखा युनिट २ चे पथक मंगळवारी (३ फेब्रुवारी) रात्री कॅम्प परिसरात गस्तीवर होते. यावेळी एमजी रोडवरील एका शाळेसमोर दोन मुलं संशयास्पदरीत्या कोणाची तरी वाट पाहत उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांना पाहताच त्यांची धाकधूक वाढली, ज्यामुळे संशय बळावला. पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दोघेही १८ वर्षांखालील असल्याचे समोर आले.
advertisement
एमडी आणि इलेक्ट्रॉनिक काटा जप्त
पोलिसांनी या मुलांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची पावडर आढळली. 'फिल्ड टेस्ट किट'द्वारे तपासणी केली असता ते अमली पदार्थ 'मेफेड्रोन' (MD) असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे एकूण १३ ग्रॅम वजनाचे ड्रग्ज आणि एक छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटाही सापडला आहे. नशा करण्यासाठी आणि विक्रीसाठी हे ड्रग्ज त्यांनी स्वतःजवळ बाळगल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
advertisement
कॅम्पसारख्या गजबजलेल्या आणि शैक्षणिक परिसरात अल्पवयीन मुलांच्या हाती अशा प्रकारचे अमली पदार्थ लागल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या मुलांकडे इतक्या मोठ्या किमतीचे ड्रग्ज आले कुठून आणि यामागे कोणती मोठी टोळी कार्यरत आहे का? याचा तपास लष्कर पोलीस करत आहेत. जप्त केलेले नमुने अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पोलीस हवालदार विशाल दळवी यांनी याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुण्यात 'ड्रग्ज फ्री' मोहिमेअंतर्गत कारवाई अधिक कडक करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्याच्या कॅम्प परिसरात शाळेसमोरच उभी होती 2 अल्पवयीन मुलं, जवळ जाताच समजलं असं कांड की उडाली खळबळ
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement