advertisement

बारामतीत खळबळ! 7 दिवसांपासून फोन उचलत नव्हती विवाहिता; दरवाजा उघडताच बेडवरील ब्लँकेटखाली दिसलं थरकाप उडवणारं दृश्य

Last Updated:

गेल्या ६-७ दिवसांपासून सुजाता फोन उचलत नसल्याने काळजीपोटी त्यांचे भाऊ आणि माहेरचे लोक सोनगावला पोहोचले. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, सुजाता यांचा मृतदेह कॉटवर ब्लँकेटने झाकलेल्या अवस्थेत आढळून आला.

सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह (AI Image)
सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह (AI Image)
बारामती : बारामती तालुक्यातील सोनगाव येथे एका ३८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह तिच्या राहत्या घरात अत्यंत विदारक आणि सडलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सुजाता स्वप्नील निंबाळकर असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून माहेरच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, संतापाच्या भरात सुजाता यांचा अंत्यविधी चक्क सासरच्या घरासमोरच केला.
आठवडाभर मृतदेह घरातच होता
सुजाता या सासरच्या वस्तीवरील घरात एकट्याच राहत होत्या. त्यांचे पती नोकरीनिमित्त पुण्यात असतात, तर सासू-सासरे बारामती शहरात राहतात. गेल्या ६-७ दिवसांपासून सुजाता फोन उचलत नसल्याने काळजीपोटी त्यांचे भाऊ आणि माहेरचे लोक सोनगावला पोहोचले. घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता, सुजाता यांचा मृतदेह कॉटवर ब्लँकेटने झाकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत्यूला अनेक दिवस उलटल्याने मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता.
advertisement
पोलीस तपासातील प्राथमिक अंदाजानुसार, सुजाता यांचा मृत्यू नैसर्गिक असावा. झोपेत असताना अचानक एखादे गंभीर वैद्यकीय कारण उद्भवले असावे आणि घरात कोणीही नसल्यामुळे त्यांना वेळेवर मदत मिळाली नसावी, ज्यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मृतदेह झाकलेल्या अवस्थेत असल्याने माहेरच्यांचा संशय बळावला आहे.
नातेवाइकांचा संताप आणि घरासमोर अंत्यविधी
हा प्रकार समोर येताच सुजाता यांच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर कौटुंबिक छळ आणि घातपाताचा आरोप केला. संताप इतका अनावर होता की, गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या उपस्थितीतच त्यांनी सुजाता यांचा अंत्यविधी सासरच्या घरासमोर करून आपला निषेध नोंदवला. या अनपेक्षित प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
advertisement
पोलीस सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
बारामतीत खळबळ! 7 दिवसांपासून फोन उचलत नव्हती विवाहिता; दरवाजा उघडताच बेडवरील ब्लँकेटखाली दिसलं थरकाप उडवणारं दृश्य
Next Article
advertisement
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल, इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट
नव्या भविष्यवाणीने जग हादरलं, अमेरिका तर सावरणार नाही; वाक्य ऐकून घाम सुटेल
  • 2008 पेक्षाही महाभयंकर आर्थिक संकट दारात

  • गुंतवणूकदारांना धोक्याचा इशारा

  • नव्या भविष्यवाणीने जग हादरलं

View All
advertisement