बेंगळुरूमध्ये ही धक्कादायक घटना घडली. एक्स गर्लफ्रेंडला अश्लील मेसेज पाठवणे तरुणाला महागात पडले. मुलीने तिचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे अपहरण केले. त्यानंतर त्याला नग्न करून त्याच्या गुप्तांगावर मारहाण करण्यात आली. आरोपींपैकी एकाने या घटनेचा व्हिडिओ देखील बनवला आहे.
रेणुका स्वामी सारखंच मारण्याचा डाव...
प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनवर रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीची हत्या केल्याचा आरोप आहे. रेणुका स्वामी याने सोशल मीडियावर अभिनेत्री पवित्रा गौडा हिच्यावर अश्लील टिप्पणी केली होती. त्यानंतर दर्शनने त्याच्या साथीदारांसह त्याची हत्या केली. येथेही मुलीच्या प्रियकराने त्याच्या मित्रांसह त्याच पद्धतीने ही घटना घडवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
व्हिडीओ फूटेजमध्ये घटना कैद...
घटनेच्या व्हिडिओ फुटेजमध्ये काही लोक तरुणीचा एक्स बॉयफ्रेंड कुशलला मारहाण करत असल्याचे दिसून आले. या लोकांनी कुशलला नग्न केले आणि त्याच्या गुप्तांगावरही मारहाण केली. अधिकाऱ्यांच्या मते, कुशल दोन वर्षांपूर्वी एका महाविद्यालयीन विद्यार्थीनीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र, काही महिन्यांनी दोघांचेही नाते संपुष्टात आले. नंतर मुलीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध होते. याचा राग आल्याने कुशलने मुलीला काही अश्लील मेसेज पाठवले.
पॅचअपच्या बहाण्याने फोन केला
याचा बदला घेण्यासाठी मुलीने तिच्या प्रियकर आणि त्याच्या मित्रांसह हल्ला करण्याचा कट रचला. त्यानंतर तरुणीने पॅचअप करण्यासाठी कुशलला एका ठिकाणी बोलावलं. पण तिथे चर्चा करण्याऐवजी त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी त्याला बळजबरी गाडीत बसवले आणि तलावाच्या काठावरील एका निर्जन ठिकाणी नेले. तिथे सर्वांनी कुशलला बेदम मारहाण केली. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे.
रेणुका स्वामी हत्या प्रकरण काय आहे?
रेणुका स्वामी हा कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील राहणारा होता. त्याने अभिनेत्री पवित्रा गौडा हिला अश्लील मेसेज पाठवले होते. त्यानंतर तिचा पती दर्शन याने संतापून रेणुका स्वामीचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. स्वामी यांचा मृतदेह बेंगळुरूतील सुमनहल्ली येथे आढळला. या मृतदेहावर अनेक जखमा होत्या. सुरुवातीला चार जण पोलिसांना शरण गेले. त्यांनी सांगितले की पैशावरून रेणुका यांच्याशी त्यांचे भांडण झाले होते. परंतु त्यांचे जबाब जुळत नव्हते. पोलिसांच्या सखोल तपासात अभिनेता दर्शन आणि इतरांना पोलिसांनी अटक केली.