ही दुःखद घटना बेंगळुरूजवळील नेलमंगला तालुक्यातील विशिषापुरा (नागल्लू) गावातील आहे. येथे राहणाऱ्या राधे नावाच्या महिलेने तिच्या दीड महिन्याच्या मुलाला उकळत्या पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून मारले. चिमुकल्या बाळाने काही दिवसांपूर्वीच या जगात प्रवेश केला होता.
राधे आणि तिचा पती पवन यांनी नुकतेच एका मुलाला जन्म दिला होता. पण पवनला दारूचे व्यसन होते. घरात पैशांची कमतरता होती आणि तो राधेची किंवा मुलाची काळजी घेऊ शकत नव्हता. या सर्व परिस्थितीमुळे राधे मानसिकदृष्ट्या खचली होती. या खिन्नतेतून तिने चिमुकल्या बाळाला ठार केलं असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
रात्री उशिरा घडली घटना...
रात्री उशिरा ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. सर्वजण झोपलेले असताना राधेने शांतपणे तिच्या मुलाला मांडीवर घेतले आणि उकळत्या पाण्यात टाकले. काही क्षणातच त्या निष्पाप मुलाचा जीव गेला. ही माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली.
आता या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. नेलमंगला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की ते सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. गरिबी आणि घरगुती परिस्थिती खरोखरच आईला इतके निर्दयी बनवू शकते का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.