TRENDING:

Dating App Scam : 'बुलाता है मगर जाने का नही' आधी गे डेटिग ऍपवर मैत्री मग न्यूड... धक्कादायक प्रकरण समोर

Last Updated:

हे प्रकरण एका गे डिटिंग ऍपवरील आहे. इथे एक टोळी गे डेटिंग ॲपवर युवांना फसवत होती आणि त्यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळत होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंंबई : ऑनलाईन डेटिंग ॲप सध्या तरुण पिढीसाठी काळाची गरज झालं आहे. जवळ-जवळ सगळेच तरुण मंडळी या डेटिंग ऍपवर असतात. इथे लोक आवडीनिवडी पाहून ओळख करतात, मग या ओळखीचं रुपांतर मैत्रित होतं आणि नंतर डेटिंग-प्रेम यासारख्या गोष्टी सुरु होतात.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

या ऍपचा जितका फायदा आहे, तितका तोटा देखील आहे. कारण या गोष्टीचा फायदा घेत काही ठग मंडळी देखील यावर आपलं अकाउंट तयार करतात आणि लोकांची फसवणूक करतात. असंच एक प्रकरण आहे, ज्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

हे प्रकरण एका गे डिटिंग ऍपवरील आहे. इथे एक टोळी गे डेटिंग ॲपवर युवांना फसवत होती आणि त्यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपये उकळत होती.

advertisement

या टोळीने ऑनलाईन गे डेटिंग ॲपवर वेगवेगळ्या नावांनी प्रोफाइल तयार केल्या. ते आकर्षक प्रोफाइल आणि फसव्या ऑफर देऊन तरुणांना आपल्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना एका ठराविक ठिकाणी भेटायला बोलवायचे. तेव्हा समोरील व्यक्तीला वाटायचं की काहीतरी वेगळं आणि रोमांचक होणार आहे, पण वास्तव मात्र वेगळंच होतं.

जेव्हा ही मंडळी ठरलेल्या जागी पोहोचायची, तेव्हा त्यांना एका खोलीत नेलं जायचं, जिथे आधीच टोळीचे 7-8 गुंड तयार असायचे. मग सुरू व्हायचा धमक्या देण्याचा, मारहाण करण्याचा आणि ब्लॅकमेलिंगचा खेळ.

advertisement

पीडितांना नग्न करून त्यांचे व्हिडिओ बनवले जायचे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जायचे.

एका सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि बँक कर्मचाऱ्याला लुटलं

हे प्रकरण गाझियाबादमधील आहे, इथे या टोळीने एका सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि एका बँक कर्मचाऱ्याला आपल्या जाळ्यात ओढलं. बँकेत काम करणाऱ्या तरुणाला इतकी भीती वाटली की, त्याने ऑनलाईन लोन घेतलं आणि टोळीला तब्बल 1.18 लाख रुपये ट्रान्सफर केले. दुसऱ्या पीडित सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही घाबरून 70 हजार रुपये दिले.

advertisement

पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार आल्यानंतर कारवाई करण्यात आली. जेव्हा पोलिसांनी ठराविक जागेवर छापा टाकला, तेव्हा आरोपी एका दुसऱ्याच पीडिताकडून पैसे वसूल करत होते. पोलिसांनी तात्काळ आठ जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून नऊ मोबाईल फोन आणि ७० हजार रुपये जप्त करण्यात आले.

कोण होते हे आरोपी?

अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी कोणी प्रॉपर्टी डीलर आहे, कोणी विद्यार्थी आहे, तर कोणी दुकान चालवतो. त्यांच्यात स्पॉट बॉयपासून ड्रायव्हरपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी संजयनगरच्या सूर्या गार्डनमध्ये एका फ्लॅटचं भाड्याने भाडे करार केलं होतं, जिथे त्यांनी हा गुन्हा केला.

advertisement

अशा फसवणुकीपासून कसे वाचाल?

ऑनलाईन डेटिंग ॲपवर अनोळखी लोकांवर पटकन विश्वास ठेवू नका.

कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटायला जाऊ नका.

अनोळखी व्हिडिओ कॉल किंवा मेसेजेसना उत्तर देऊ नका.

फसवणुकीचा संशय आला तर त्वरित पोलिसांकडे तक्रार करा.

पोलिस तुमची ओळख गोपनीय ठेवतील, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावरचं ‘ते’ पोस्टर पाहिलं, लेकासाठी आईनं मंगळसूत्र विकलं; मराठमोळा विक्रम भारताचा फिटनेस ब्रँड अम्बॅसिडर, Video
सर्व पहा

हे प्रकरण म्हणजे ऑनलाईन डेटिंगच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा एक धक्कादायक नमुना आहे. त्यामुळे सतर्क राहा आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर पटकन विश्वास ठेवण्याआधी नीट विचार करा.

मराठी बातम्या/क्राइम/
Dating App Scam : 'बुलाता है मगर जाने का नही' आधी गे डेटिग ऍपवर मैत्री मग न्यूड... धक्कादायक प्रकरण समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल