गुजरातमधील बनासकांठा येथील चंद्रिका चौधरी असे या 18 वर्षीय तरुणीसोबत ही घटना घडली असल्याचे समोर आले आहे. तरुणीचे वडील, काकांविरोधात तरुणीच्या मित्राने तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. तरुणीने नीट परीक्षेत 478 गुण मिळवले होते. त्यामुळे ती सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी पात्र ठरली होती. तिला तिचा अभ्यास सुरू ठेवायचा आणि स्वतंत्रपणे जगायचे होते, परंतु तिच्या कुटुंबाला कदाचित हे मान्य नव्हते.
advertisement
काकाने कॉलेजमध्ये मुला-मुलींना एकत्र पाहिले अन्...
चंद्रिकाचा काका शिवराम याने प्रवेश प्रक्रिये दरम्यान, काही महाविद्यालयांना भेट दिली होती. त्यावेळी त्याने मुले आणि मुली एकत्र शिकताना पाहिले. त्याने, तिच्या वडिलांना सांगितले की तिला तिथे पाठवू नये. ती एखाद्या मुलाच्या प्रेमात पडून त्याच्याशी लग्न करू शकते. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा फोन काढून घेतला, सोशल मीडियापासून तिचे कनेक्शन तोडले आणि तिला फक्त घरातील कामे करायला लावली," असा दावा चंद्रिकाचा जोडीदार 23 वर्षीय हरेश चौधरीने केला.
दुधातून विषारी द्रव पाजलं अन्...
समोर आलेल्या माहितीनुसार, चंद्रिका चौधरीला तिचे वडील सेंधा यांनी विषारी द्रव असलेले दूध पाजल्याचा आरोप आहे आणि त्यानंतर 25 जून रोजी त्यांनी आणि तिचे काका शिवराम यांनी दुपट्ट्याने तिचा गळा दाबून हत्या केलाी असल्याचे समोर आले आहे. तिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन न करता घाईघाईने अंत्यसंस्कारही करण्यात आले. चंद्रिकाचे काका शिवराम यांनी काही गावकऱ्यांना चंद्रिकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले होते. पोलिसांनी शिवरामला ताब्यात घेतले असून वडील सेंधा हे फरार आहेत.
हायकोर्टातील सुनावणी आधीच हत्या...
चंद्रिकाचा मित्र हरेश याने मैत्रिणीसाठी गुजरात उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी होण्याआधीच चंद्रिकाची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिची हत्या हा पूर्वनियोजित कट असल्याचे दिसून आले.
चंद्रिक आणि हरेश होते रिलेशनशीपमध्ये...
या वर्षी फेब्रुवारीमध्ये चंद्रिका पहिल्यांदा हरेशला भेटली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की चंद्रिकाच्या कुटुंबाने घाईघाईने मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे घोषित केले आणि शवविच्छेदन न करता मृतदेहाचे त्वरित अंत्यसंस्कार केले.
एफआयआरनुसार, "दूध घे आणि आराम कर. चांगली झोप घे असे चंद्रिकाने तिच्या वडिलांकडून ऐकलेले शेवटचे शब्द होते, असे एफआयआरमध्ये म्हटले आहे. हरेशने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रिकाच्या हत्येआधीच्या दोन आठवड्यांपूर्वी या जोडप्याने लिव्ह-इनवर स्वाक्षरी केली होती. तिला डॉक्टर व्हायचे होते आणि आम्हाला शांतते आपलं आयुष्य जगायचं होतं, असे हरेशने सांगितले.