पोलिसांनी सांगितलं की, ती तिच्या साथीदारांना गुन्हा करण्यासाठी मदत करण्याकरता तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून डॉक्टरच्या घराचे फोटो शेअर करत होती. दिल्ली पोलिसांनी सोमवारी चार फरार संशयितांचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज शेअर केले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांनी संशयितांचे स्केचही बनवले आहेत आणि ती विविध राज्यांच्या पोलीस विभागांना तसेच नेपाळ पोलिसांशी शेअर केली आहेत.
advertisement
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, 'चोरीसाठीचं प्लॅनिंग दोन महिन्यांपूर्वीच सुरू झालं होतं. बसंती तिच्या फेसबुक अकाउंटवर सुमारे पाच ते सहा महिन्यांपासून फोटो पोस्ट करत होती. ती खोल्या आणि घराचे फोटो काढायची आणि पोस्ट करायची. आम्हाला वाटतं, की तिने बऱ्याच काळापासून मौल्यवान वस्तू लुटण्याची योजना आखली होती आणि सर्व खोल्यांच्या फोटोंची नोंद ठेवली होती. नंतर तिने या प्लॅनमध्ये तिच्या मैत्रिणी वर्षा आणि सईचाही समावेश केला.'
पोलिसांनी रविवारी सांगितलं की त्यांनी बसंती, हरिद्वार येथील पुजारी हिमांशू (38) आणि त्याचा भाऊ आकाश यांना अटक केली आहे. आरोपींनी तीन नेपाळी नागरिक आणि आणखी एका नोकराची मदत घेतल्याचा आरोप आहे, ज्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
डॉ. योगेश चंद्र पॉल यांची शुक्रवारी त्यांच्या घरात निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यांच्या पत्नी डॉ. नीना पॉल यांना स्वयंपाकघरात पतीचा मृतदेह आढळला. आरोपींनी दुपारी दीड वाजता क्लिनिकमधून घरी परतलेल्या डॉ. योगेश यांच्या घरात घुसून त्यांचे हात बांधून, गळा आवळून खून केला. हत्येपूर्वी आरोपींनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं होतं. घटनेनंतर आरोपींनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला.