advertisement

Delhi Crime News: खुर्चीला बांधलं, तोंडावर टेप, कुत्र्यांना बाथरूममध्ये लॉक केलं अन्.. CCTV कॅमेऱ्याने उघड केलं कांड

Last Updated:

Delhi Crime News: दिल्लीतील व्हीव्हीआयपी परिसरात अशी एक गुन्ह्याची घटना घडली आहे, ज्याने सर्वसामान्यांनाच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला आहे. याप्रकरणी आता एक नवीन बाब समोर आली आहे.

News18
News18
नवी दिल्ली : वृद्ध व विशेषतः मुलांपासून लांब राहणाऱ्या नागरिकांनी स्वसुरक्षेसाठी जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. वेळोवेळी सरकारी यंत्रणांकडून त्याबाबत माहिती दिली जाते; मात्र तरीही समाजात अशा वृद्ध नागरिकांना लक्ष्य करून लूटमारीच्या घटना घडतातच. दिल्लीच्या व्हीव्हीआयपी भागात काही दिवसांपूर्वी एका वृद्ध डॉक्टरची क्रूरतेनं हत्या करण्यात आली होती. त्याचं गूढ पोलिसांनी उकललं आहे.
दिल्लीतल्या जंगपुरा भागात राहणाऱ्या एका वृद्ध डॉक्टरची काही दिवसांपूर्वी राहत्या घरात निर्दयपणे हत्या करण्यात आली. हत्येपूर्वी त्यांचा खूप छळ करण्यात आल्याचं पोलीस चौकशीत समोर आलंय. घराजवळच्या सीसीटीव्ही फूटेजमधून पोलिसांना या घटनेबाबत बरीच माहिती मिळाली आहे. त्या वृद्ध डॉक्टरचा गळा पट्ट्यानं आवळण्यात आला व त्याआधी त्यांच्या डोक्यावर एखादी वस्तू मारण्यात आली होती, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
advertisement
आग्नेय दिल्लीच्या जंगपुरा भागात राहणारे योगेश चंद्र पॉल (63) हे शुक्रवारी (10 मे) राहत्या घरी मृतावस्थेत आढळले. त्यांचे हात-पाय बांधलेले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घराच्या जवळचं सीसीटीव्ही फूटेज तपासलं. तेव्हा त्यात चार संशयित घराजवळ दिसले. त्यापैकी एक जण बाहेर उभा राहिला व इतर तीन जण घरात गेले. आरोपींनी पॉल यांना मारहाण केली, खुर्चीला बांधून ठेवलं व त्यांचं तोंडही बंद केलं.
advertisement
पॉल यांना खुर्चीला बांधून त्यांना ते स्वयंपाकघरात घेऊन गेले. तिथे त्यांच्या डोक्यावर एका वस्तूनं वार केला. पॉल यांच्या दोन्ही कुत्र्यांना आरोपींनी बाथरूममध्ये बंद करून ठेवलं आणि कुत्र्याच्या गळ्यातल्या पट्ट्यानं पॉल यांचा गळा आवळला. घरातून बाहेर पडण्याआधी आरोपींनी घरातल्या सामानाची तोडफोड केली. या घटनेबाबत पोलिसांनी हत्या आणि दरोड्याचा गुन्हा नोंदवला आहे.
advertisement
वाचा - मुलाला ड्रग्ज देऊन नशेत असताना करून घ्यायची हे धक्कादायक काम, मुंबईतील आईचं कांड
डॉक्टर पॉल त्यांची पत्नी नीना पॉल यांच्यासह जंगपुरा भागातील घरी राहत होते. नीना पॉल या दिल्लीतल्या एका सरकारी रुग्णालयात डॉक्टर आहेत. नवऱ्याची हत्या झाली, तेव्हा त्या रुग्णालयातच होत्या. त्या दोघांना दोन मुली असून एक मुलगी नोएडा, तर दुसरी कॅनडाला राहते. दोन्ही मुलींची लग्नं झाली आहेत. या घटनेबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
advertisement
सध्याच्या काळात मुलं परदेशी शिक्षण व नोकरीसाठी गेल्यानं अनेक वृद्ध घरी एकटे असतात. अशा एकट्या व वृद्ध नागरिकांवरचे हल्ले वाढत आहेत. त्यामुळे अशा नागरिकांनी स्वसुरक्षेची पुरेशी काळजी घेतली पाहिजे.
view comments
मराठी बातम्या/देश/
Delhi Crime News: खुर्चीला बांधलं, तोंडावर टेप, कुत्र्यांना बाथरूममध्ये लॉक केलं अन्.. CCTV कॅमेऱ्याने उघड केलं कांड
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement