मुलाला ड्रग्ज देऊन नशेत असतानाच करून घ्यायची हे धक्कादायक काम, मुंबईतील आईचं कांड ऐकून पोलीसही हादरले

Last Updated:

प्रकरणात चोरी करणाऱ्या आरोपीची आई गुन्हा करण्यापूर्वी त्याला ड्रग्ज देत असे, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

चोरीआधी मुलाला द्यायची ड्रग्ज
चोरीआधी मुलाला द्यायची ड्रग्ज
मुंबई : मुंबई पोलिसांनी वारंवार चोऱ्या करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करून खळबळजनक खुलासा केला आहे. प्रकरणात चोरी करणाऱ्या आरोपीची आई गुन्हा करण्यापूर्वी त्याला ड्रग्ज देत असे, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. यानंतर तो नशेत हे गुन्हे करत असे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपीचं नाव 24 वर्षीय कृष्णा रवी म्हैसकर असं आहे. त्याच्यावर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे 22 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलिसांसमोर धक्कादायक बाब आली. हे जाणून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. काळाचौकी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र चव्हाण म्हणाले, "म्हैसकर हा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या सर्व गुन्हेगारी कारवायांमध्ये त्याची आई विजेता म्हैसकर (50) हिची महत्त्वाची भूमिका होती. चोरीपूर्वी ती त्याला अमली पदार्थ द्यायची. इतकंच नाही तर चोरीतून मिळालेल्या वस्तू आणि पैसे ती स्वतःकडे ठेवायची.
advertisement
आई आणि मुलगा मध्य मुंबईतील काळाचौकी भागातील रहिवासी असल्याचे त्यांनी सांगितले. आग्रीपाडा परिसरातून कृष्णा रवी म्हैसकरला अटक करण्यात आली, तर आई विजेता म्हैसकर फरार आहे. तिला पकडण्यासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
advertisement
वायर चोरीची घटना
दुसरीकडे याच महिन्यात मुंबई पोलिसांनी वायर चोरीच्या आरोपाखाली दोघांना अटक केली होती. दोघेही तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचे सांगण्यात आले. अशोक शिंदे (43) आणि राजकुमार यादव (26) अशी आरोपींची नावे आहेत. अशोक शिंदे हा व्यवसायाने मजूर असून राजकुमार हा चालक आहे. टेलिफोन एक्सचेंजसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन 60 मीटरच्या तांब्याच्या पीयूसी केबल गायब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याची किंमत 2.16 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. केबल चोरीची तक्रार मिळाल्याचे तपास अधिकारी एपीआय लीलाधर पाटील यांनी सांगितलं. त्याच दिवशी त्यांचे डिटेक्शन कर्मचारी गस्तीवर होते.
मराठी बातम्या/मुंबई/
मुलाला ड्रग्ज देऊन नशेत असतानाच करून घ्यायची हे धक्कादायक काम, मुंबईतील आईचं कांड ऐकून पोलीसही हादरले
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement