7 ऑगस्टला कोलाला गावाजवळून लोक रस्त्याने चालत होते, तेव्हा त्यांना ठराविक अंतरावर प्लास्टिकच्या पिशव्या ठेवल्याचं दिसून आलं. यानंतर त्यांनी या पिशव्या उघडल्या तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या पिशव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे होते, हे पाहून त्यांनी लगेचच पोलिसांना फोन करून बोलवून घेतलं. यानंतर पोलिसांनी मर्डर मिस्ट्री सोडवण्यासाठी पोलीस अधिक्षक अशोक के.व्ही. यांनी एक टीम बनवली.
advertisement
पोलिसांच्या टीमने बराच तपास केल्यानंतर तीन आरोपींना अटक केली. यामध्ये लक्ष्मी देवीचा जावई डॉ. रामचंद्रप्पा एस आणि त्याचे दोन सहकारी सतीश के.एन आणि किरण के.एस. यांचा समावेश होता. हे तिघेही कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्याचे रहिवासी होते आणि त्यांनी लक्ष्मी देवी यांची हत्या करून कोरतगेरे भागात मृतदेहाचे तुकडे फेकून दिले. डॉक्टर रामचंद्रप्पा हे तुमकुरूमधील प्रसिद्ध डेन्टिस्ट आहेत.
काय होतं हत्येचं कारण?
जावई डॉ. रामचंद्रप्पा याला त्याची सासू लक्ष्मी देवी हिच्या चारित्र्यावर संशय होता. सासूच्या चारित्र्यामुळे आपली अब्रू जात असल्याचं रामचंद्रप्पा याला वाटत होतं. याच रागातून रामचंद्रप्पा याने त्याच्या मित्रांना सोबत घेतलं आणि लक्ष्मी देवीच्या हत्येचा कट रचला. हत्या केल्यानंतर रामचंद्रप्पा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लक्ष्मी देवीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि वेगवेगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरले. पुरावा मिटवण्यासाठी त्यांनी या पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्या.