इंदोर, 13 ऑगस्ट : स्वातंत्र्य मिळून भारताला यंदा 76 वर्ष पूर्ण होत आहेत. दोन दिवसांवर आलेला स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी देशाच्या विविध भागांमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. अतिशय सुरळीतरित्या स्वातंत्र्य दिवस पार पडावा यासाठी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशातच मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये दोन दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली. पोलीस स्थानकात एक फोन आला आणि मोठी खळबळ उडाली.
advertisement
इंदोरमधील सी-21 मॉलच्या लिफ्टमध्ये बॉम्ब ठेवल्याचा हा फोन होता. पोलिसांनी ही माहिती कोणी दिली असं विचारलं असता, सूचना देणाऱ्याने एक नंबर दिला आणि फोन ठेवला. बॉम्ब कधीही फुटू शकतो, मॉलमधील शेकडो लोकांच्या जीवाला धोका आहे, या काळजीने पोलिसांनी बॉम्बशोधक पथकालाही याबाबत माहिती दिली. मात्र ज्या व्यक्तीने बॉम्बबाबत कळवलं, त्याला इतर कोणी माहिती का दिली असेल, पहिल्या व्यक्तीने थेट पोलिसांना का फोन केला नाही, असा संशय आला आणि पोलिसांनी सूचना देणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावर फोन लावला.
Apple iPhones च्या वापरावर या देशात घातली बंदी! पण कारण काय?
फोनची रिंग अगदी सर्वसामान्य फोनसारखी होती. फोन उचलला गेला आणि पहिला हॅलो ऐकताच पोलिसांच्या संपूर्ण प्रकरण लक्षात आलं. कोणीतरी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचं पोलिसांना कळलं. तपास केला असता, एक धक्कादायक माहिती समोर आली.
FD वर ही बँक देतेय 9.10 टक्के जबरदस्त व्याज, एवढ्या दिवसांसाठी गुंतवावे लागतील पैसे!
C21 मॉलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच मॉलमध्ये बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. 2 महिने पगार न मिळाल्याने हा कर्मचारी चिंतेत होता. त्यातूनच त्याने हा खोडसाळपणा केल्याचं पोलिसांना कळलं. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतलं. कारवाईनंतर त्याला सोडून देण्यात आलं. मात्र त्याची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन थकलेला पगार त्याला मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्न करणार आहेत.