Apple iPhones च्या वापरावर या देशात घातली बंदी! पण कारण काय?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
iPhone आणि iPad ची निर्मिती जगाची अग्रणी मोबाइल फोन कंपनी Apple द्वारे केली जाते. एका रिपोर्टच्या हवाल्याने सांगण्यात आलं की, रशियाच्या डिजिटल डे्हलपमेंट मंत्रालयाने सरकारी ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना Apple iPhones चा वापर न करण्याचा आदेश दिलाय.
आयफोन आणि आयपॅडची निर्मिती अॅपल या जगातील आघाडीची मोबाइल फोन कंपनी करते. एका रिपोर्टचा हवाला देत असे म्हटले आहे की, रशियाच्या डिजिटल विकास मंत्रालयाने सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना Apple iPhones न वापरण्याचे आदेश दिले आहेत. इंटरफॅक्स न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, मंत्री मकसुत शादाएव यांच्या नेतृत्वाखालील रशियाच्या डिजिटल विकास मंत्रालयाने कर्मचार्यांद्वारे कामाशी संबंधित हेतूंसाठी Apple iPhones आणि iPads वापरण्यास बंदी घातली आहे.
advertisement
रशियन सरकारने काय म्हटलंय? - शादेव यांनी एका डिजिटल संमेलनात म्हटलंय की, 'वर्क रिलेटेड अॅप्लिकेशन्सपर्यंत पोहोचण्यासाठी आणि वर्क रिलेटेड ईमेलच्या एक्सचेंजसाठी स्मार्टफोन आणि टॅबलेटसह (Apple) मोबाइल उपकरणांच्या उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे.' ते म्हणाले की, वयक्तिक गरजांसाठी आयफोनचा वापर करण्यासाठी अजुनही परावानगी आहे.
advertisement
advertisement
Apple रशियामधून बाहेर पडतो - बऱ्याच रशियन लोकांना आयफोन आणि आयपॅड डिव्हाइसेस वापरण्याची आवड आहे. गेल्या फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने शेजारी देश युक्रेनवर हल्ला केला होता. युक्रेन अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांच्या मदतीने याविरोधात लढत आहे. मार्च 2022 मध्ये, Apple रशियातून बाहेर पडले आणि युक्रेनच्या आक्रमणानंतर विक्री थांबवली.
advertisement
Appleने आरोप फेटाळून लावले - रशियाची प्राथमिक सुरक्षा एजन्सी एफएसबीने म्हटले आहे की, अमेरिकी जासूसी अभियानासाठी रशियाच्या लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या हजारो Apple डिव्हायसेससोबत समझोता करण्यात आलाय. एफएसबीने सांगितले की, Apple आणि यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने मिळून हे काम केलेय. यानंतर रशियाच्या डिजिटल विकास मंत्रालयाने देशातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक परिपत्रक जारी केले आहे. Apple ने हे आरोप फेटाळले आहेत. मात्र तरीही यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सीने या दाव्यांना प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला होता.