शीतल अमर भोजणे (वय-29. रा. एलआयसी काॅलमी, कळंबा) असे मृत महिलेचे नाव आहे. स्फोट झाल्यानंतर त्वरित त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे सासर अनंत भोजणे (वय-60) यांची प्रकृती अजूनही गंभीर असून स्फोटात जखमी झालेला मुलगा प्रज्वल (वय-साडेपाच वर्षे) आणि मुलगी इशिका (वय-साडेतीन वर्षे) यांची प्रकृती स्थिर आहे. या धक्कादायक घटनेची नोंद राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
advertisement
पाइपलाइनद्वारे घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून सोमवारी (25 जुलै) कनेक्शन घेण्यात आले होते. कनेक्शन घेतल्यानंतर गॅस गळती सुरू झाली आणि भीषण स्फोट झाला. रात्री 11 वाजता ही घटना घडली होती. यात अमर भोजणे यांच्या पत्नी, 2 मुले आणि वडील जखमी झाले होते. उपचारादरम्यात शीतल यांचा मृत्यू झाला. स्फोट झाला तेव्हा त्या स्वयंपाकघरातच होत्या, त्यामुळे त्या 100 टक्के भाजल्या होत्या.
प्लंबरकडून केली जातीय गॅस कनेक्शनची जोडणी?
घरगुती गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून काही ठेकेदारांना काम देण्यात आलं आहे. त्याचं कर्मचाऱ्यांचं योग्य प्रशिक्षण झालेलं नाही. त्यामध्ये प्लंबरकडून ही गॅस जोडणी केली जात आहे, अशी माहिती शेजाऱ्यांकडून पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
फाॅरेन्सिक विभागाकडून तपासणी
या घटनेनंतर जुना राजवाडा पोलिसांनी कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलेला आहे. जखमींचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. फाॅरेन्सिक विभागाकडून तपासणी करण्यात आली आहे. या स्फोटाच्या कारणाचा तपास करण्यासाठी काही पुरावेही गोळा करण्यात आले आहे.
हे ही वाचा : मुलगा नाही सैतान, आईला कुऱ्हाडीने कापलं, बॉडीच्या तुकड्यांसमोर बसून गाणं गायला
हे ही वाचा : तरुणीला इन्स्टावर एक मेसेज अन् होत्याचं नव्हतं झालं; नालासोपाऱ्यातील प्रतिकला भर रस्त्यात संपवलं!
