TRENDING:

YouTube पाहून डॉक्टरचं ऑपरेशन, कापून टाकल्या आतड्या आणि नसा; महिलेचा तडफडून मृत्यू.

Last Updated:

बाराबंकी जिल्ह्यात समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने, लोकांना पुन्हा एकदा विचार करायला लावले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आजकाल सोशल मीडियामुळे आपल्या जीवनात खूप सोपेपणा आला आहे. एखाद्या पदार्थाची रेसिपी बनवायची असोत, एखादी समस्या असोत किंवा एकादा आर्ट ऍन्ड क्राफ्ट, सगळ्याच गोष्टींसाठी आपण युट्यूब वापरतो. म्हणजे अगदी एखादी गोष्ट कशी वापरायची, फोनमधील प्रॉब्लम सॉल्व ते एखादी कॉन्सेप्ट समजणं सगळं म्हणजे अगदी सगळं युट्यूबवरच होत आहे. YouTube किंवा Google आता लोकांसाठी मार्गदर्शक बनले आहेत.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

यावीरल माहितीचा उपयोग अनेकांचे मोठ-मोठे प्रश्न सॉल्व झाले असले तरी देखील काही गोष्टी मात्र आपण त्याच्याकडून न शिकणेच जास्त चांगले रहाते. त्यापैकी एक म्हणजे गोळ्या-औषध घेणं, इलाज करणं किंवा एखादी शस्त्रक्रिया करणं.

पण, उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात समोर आलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटनेने, लोकांना पुन्हा एकदा विचार करायला लावले आहे. आपण कोणावर आणि किती विश्वास ठेवतो? आणि कोणत्या गोष्टीला आपण किती सिरियसली घ्यायला पाहिजे.आता नक्की काय झालं? कसं झालं असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील?

advertisement

खरंतर एका झोलाछाप डॉक्टरांनी केवळ YouTube वर शस्त्रक्रियेचे व्हिडिओ पाहून, एका महिलेचे ऑपरेशन केले आणि त्यातून काय भयानक निष्पन्न झाले, याची माहिती तुम्हाला अस्वस्थ करेल. बाराबंकीच्या कोठी बाजार परिसरात असलेल्या श्री दामोदर औषधालय नावाच्या एका अनधिकृत (अवैध) दवाखान्यात ही घटना घडली.

डफरापूर येथील फतेह बहादूर यांची पत्नी मुनिशरा रावत यांना 5 डिसेंबर रोजी पोटात तीव्र वेदना जाणवल्या. ते त्यांना घेऊन या औषधालयात गेले. येथील संचालक ज्ञान प्रकाश मिश्रा आणि विवेक मिश्रा यांनी मुनिशरा यांना पित्ताशयातील खडे (Gallstones/पथरी) झाल्याचे सांगितले. शस्त्रक्रियेचा खर्च 25 हजार रुपये सांगून, 20 हजार रुपयांमध्ये सौदा निश्चित झाला.

advertisement

पैसे घेतल्यानंतर मुख्य आरोपी ज्ञान प्रकाश मिश्रा याने दारूच्या नशेत, कोणत्याही वैद्यकीय पदवीशिवाय, थेट YouTube वर ऑपरेशनचे व्हिडिओ पाहत मुनिशरा रावत यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू केली. अत्यंत निष्काळजीपणे ही शस्त्रक्रिया करताना, त्याने त्यांच्या फक्त अनेक नसाच कापल्या नाहीत, तर तपासणीत हे उघड झाले की त्याने महिलेचे महत्त्वाचे अवयव, जसे की पचननलिका (Esophagus), लहान आतडे (Small Intestine) आणि आमाशय (Stomach) देखील कापले.

advertisement

या भयंकर आणि अपूर्ण शस्त्रक्रियेनंतर मुनिशरा यांना वेदनांनी तळमळत राहिले. दुसऱ्याच दिवशी, 9 डिसेंबरच्या संध्याकाळपर्यंत मुनिशरा यांनी दवाखान्यातच अखेरचा श्वास घेतला.

रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समजताच, दवाखाना चालवणारे ज्ञान प्रकाश आणि त्याचे कुटुंब तातडीने मुनिशरा यांना त्याच अवस्थेत सोडून दवाखान्यातून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला आणि डॉक्टरच्या एका पॅनलकडून महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

advertisement

या प्रकरणी मुनिशरा यांचे पती फतेह बहादूर यांनी कोठी पोलिस ठाण्यात दोन्ही आरोपींवर सदोष मनुष्यवध (गैर इरादतन हत्या) आणि एससी/एसटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पतीने स्पष्ट केले आहे की, आरोपीकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नव्हती आणि दवाखाना पूर्णपणे बनावट होता.

आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेत दवाखान्याच्या ठिकाणी नोटीस काढली आहे. एसीएमओ डॉ. एल. बी. गुप्ता यांनी आरोपींकडून एका आठवड्याच्या आत वैद्यकीय पदवीचे उत्तर मागितले आहे. पोलिस आता आरोपींचा शोध घेत आहेत आणि त्यांना लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती कोठीचे स्टेशन हाऊस ऑफिसर अमित सिंह भदौरिया यांनी दिली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

ही घटना केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूची नाही, तर आरोग्य क्षेत्रातील 'झोलाछाप' डॉक्टरांच्या धोक्याची आणि त्यांच्यावर नियंत्रण नसलेल्या व्यवस्थेची गंभीर आठवण करून देते. आपल्या आरोग्याच्या गंभीर समस्यांसाठी नेहमी अधिकृत आणि नोंदणीकृत डॉक्टरांकडूनच उपचार घ्या.

मराठी बातम्या/क्राइम/
YouTube पाहून डॉक्टरचं ऑपरेशन, कापून टाकल्या आतड्या आणि नसा; महिलेचा तडफडून मृत्यू.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल