पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 42 वर्षांच्या गणेश चांदतार या शेतकऱ्याचं अपहण करुन हत्या करण्यात आली. अपहरण केल्यानंतर त्याला लुटलं, त्याच्याकडील फोन घेतला आणि तो विकून त्यातून येणाऱ्या पैशांतून वाढदिवस साजरा करण्याचा आरोपींचा हेतू होता. या घटनेची माहिती अभिलाष बोतेकर यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी 14 ते 17 वयोगटातील 6 अल्पवयीन मुलांनी हा सगळा कट रचला होता. त्यांना साथ देणारा 22 वर्षीय तरुण होता.
advertisement
या सगळ्यांनी मिळून शेतकऱ्याचं अपहरण केलं. त्याच्याकडून फोन चोरला, पैसे चोरले आणि त्याची निर्घृण हत्या करुन उसाच्या शेतात फेकून दिला. 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हा सगळा प्रकार या मुलांनी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींना पोलिसांनी 14 जून रोजी अटक केली. दरम्यान मृतदेह कुजलेल्या अवस्थात असल्याने पोलिसांना तपास करण्यात अनेक अडचणी येत आहेत.
वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे हवे असल्याने त्यांनी एका निष्पाप शेतकऱ्याला लुटून त्याची हत्या केली. शेतकरी गणेश हे 8 जून रोजी लग्न कार्यासाठी गेले होते, मात्र तिथून ते परतलेच नाही त्यामुळे कुटुंबीय अस्वस्थ होते. त्यांचा शोध सुरू झाला. उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. त्यांना मारहाण करुन लुटणारे, अपहरण करुन हत्या करणारे 6 अल्पवयीन आणि त्यांना साथ देणारा 22 वर्षीय व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी 14 जून रोजी आरोपींना अटक केली आहे.