इंदूर : मुलीवरुन मुलांमध्ये भांडणे झाल्याचे तुम्ही वाचले असेल किंवा पाहिले असेल. मात्र, या जिवंत मुलीच्या हत्येच्या आरोपात दोन वेगवेगळी मुली शिक्षा भोगत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे मुलीच्या नावावर कुण्या दुसऱ्या महिलेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही झाले. मध्यप्रदेशातील इंदूर येथून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे, ही घटना वाचल्यावर तुम्हालाही खूप आश्चर्य होईल.
advertisement
काय आहे संपूर्ण घटना -
25 जुलै 2022 रोजी गौतमपुरा जंगलात अर्धवट जळालेला मृतदेह पाहून पोलिसांनी मानपुरा येथून बेपत्ता मुलीच्या वडिलांना बोलावले आणि मृतदेहाची ओळख पटवली. यावेळी वडिलांनी हा मृतदेह आपल्या मुलीचाच असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी सर्व कारवाई केली आणि त्यानंतर या मृतदेहावर अंत्यसंस्कारही करण्यात आले. तसेच याप्रकरणी खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आणि एका तरुणाची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
मात्र, 8 महिन्यांनी पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक केल्यावर या प्रकरणात एक वेगळीच माहिती समोर आली. आरोपीने सांगितले की, त्याने हत्येनंतर शिवानी (वय 22), तिचा पती सतीश दशाना (रहिवासी - मोती नगर, सागौर) यांचा मृतदेह गौतमपुरा जंगलात फेकला होता. मात्र, मृतदेह मिळून न आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. यानंतर हे प्रकरण मानपुरा पोलिसांपर्यंत पोहोचले. यावेळी तपासात धक्कादायक खुलासा झाला. मानपुरा पोलिसांनी ज्या महिलेचा मृतदेहावर अंतिम संस्कार केले होते, ते शिवानीचा होता, हा खुलासा होताच एकच खळबळ उडाली.
छतावरुन पडला अन् कायमचं बंद झालं पंक्चर काढण्याचं काम, पण तो खचला नाही, आज स्वत:चा हा व्यवसाय सुरू
हा मृतदेह शिवानीचा असल्याचे समजताच मानपुरा पोलिसांनी बेपत्ता झालेल्या तरुणीच्या प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू केला. याप्रकरणी मानपुरा पोलिसांनी या तरुणीला पळवून नेणाऱ्या सोहनचा तपास सुरू केला. 8 महिन्यांनी सोहनला देवास इथून ताब्यात घेण्यात आले. तेव्हा माहिती समोर आली की, ज्या तरुणी हत्या मानून तिचा अंतिम संस्कार करण्यात आला, ती जिवंत आहे आणि सोहनसोबत आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आधीच सोहनच्या मित्राला हत्येचा सहआरोपी म्हणून तुरुंगात टाकले होते.
दरम्यान, पोलिसांनी सोहन जवळून त्या तरुणीला ताब्यात घेतले तर यावेळी आणखी एक प्रकार समोर आला. पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेताच, तिने सोहनवरच आरोप लावला. तिने म्हटले की, सोहनने तिच्यासोबत दुष्कर्म केले आहे. त्यामुळे ती अल्पवयीन असल्याने सोहनवर पोक्सो कायद्यांतर्गत आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात पोलिसांनी वकिलाच्या माध्यमातून घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला आणि हत्येचा कट आणि हत्येचे कलम काढून टाकण्यासाठी अर्ज केला आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे.
