छतावरुन पडला अन् कायमचं बंद झालं पंक्चर काढण्याचं काम, पण तो खचला नाही, आज स्वत:चा हा व्यवसाय सुरू
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
एकेकाळी सायकलचे पंक्चर काढून आपली उपजीविका भागवणाऱ्या रविंद्र कुमारची ही कहाणी आहे. छतावरून पडल्यानंतर चालण्यास त्रास होत होता. त्यामुळे सायकलमध्ये पंक्चर बनवण्याचे काम बंद पडले.
कुंदन कुमार, प्रतिनिधी
गया : आयुष्यात काही असे अनपेक्षित प्रसंग येतात, तेव्हा व्यक्तीला मोठा धक्का बसतो. मात्र, तरीसुद्धा त्यातूनही मार्ग काढणारे काही जण असतात, जे न खचता आपलं काम नव्या पद्धतीने सुरू करतात आणि पुन्हा यशस्वी होतात. आज अशाच एका तरुणाची आपण कहाणी जाणून घेणार आहोत, ज्याचा प्रवास खरंच अत्यंत अनोखा असा राहिला आहे.
advertisement
एकेकाळी सायकलचे पंक्चर काढून आपली उपजीविका भागवणाऱ्या रविंद्र कुमारची ही कहाणी आहे. आज हा रविंद्र कुमार शेळीपालनाच्या माध्यमातून आपले आयुष्य अत्यंत चांगल्या पद्धतीने जगत आहे. यामुळे आधीच्या तुलनेत त्याच्या आयुष्यातील स्तरही सुधारला गेला आहे. पण हे सर्व कसं झालं, असा प्रश्न तुमच्या आयुष्यात नक्कीच पडला असेल. एका प्रसंगाने रविंद्रचे आयुष्यच बदलून गेलं.
advertisement
रविंद्र कुमार हा गया जिल्ह्यातील परैया परिसातील झिकटिया गावातील रहिवासी आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने दोन लहान शेळ्यांपासून त्याने शेळीपालनाला सुरुवात केली. आज त्याच्याजवळ लहान मोठ्या अशा तब्बल 41 शेळ्या उपलब्ध आहेत. त्याच्याकडे दोन ब्रीडरही आहेत. याशिवाय देशी जातीच्या ब्लॅक बंगाल आणि सिरोही आणि बीटल जातीच्या शेळ्या आहेत. हजार रुपयांपासून दोन लहान शेळ्यांपासून त्याने शेळीपालनाला सुरू केली होती.
advertisement
याआधी रवींद्र हा सायकलचे पंक्चर काढण्याचे काम करायचा. मात्र, तो एकदा छतावरून पडला आणि त्यामुळे त्याला जास्त बसता येत नव्हते. म्हणून मग त्याने हा व्यवसाय सुरू करत पुन्हा आयुष्याची सुरुवात केली. आता यातूनच तो आपला उदरनिर्वाह करत आहे. वर्षभरात तो 12 ते 15 शेळ्यांची विक्रीही करतो.
photos : पिवळ्या साडीतली ग्लॅमरस निवडणूक अधिकारी आठवली का? आता कुठे लागली त्यांची ड्यूटी..
रविंद्रचे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झाले आहे. मात्र, जेव्हाही कोणती शेळी आजारी पडते तेव्हा तो स्वत: तिच्यावर उपाचार करतो. छतावरून पडल्यानंतर चालण्यास त्रास होत होता. त्यामुळे सायकलमध्ये पंक्चर बनवण्याचे काम बंद पडले. पण शेळीपालनामुळे माझे जीवनमान सुधारू लागले आहे. यातून काही उत्पन्नही मिळते, असे त्याने सांगितले.
advertisement
लोकल स्तरावर खूप मागणी -
view commentsरविंद्र हा शेळीपालनासोबतच मधमाशी पालनाशीही जोडला गेला आहे. 20 मधमाशी बॉक्सच्या माध्यमातून ते मधाचे उत्पादन करत आहे. शेळीपालन आणि मधमाशी पालन यामुळे त्याच्या आयुष्यात मोठी सुधारण होत असल्याचे चित्र आहे. मधाची आणि शेळ्यांची मागणी लोकल स्तरावर चांगल्या प्रमाणात असल्याने याठिकाणी त्यांची विक्री होते. त्याच्याजवळ उच्च प्रजातीचे दोन ब्रीडर आहे. त्यामुळे आजूबाजूचे लोक याठिकाणी ब्रीडिंगसाठी येतात.
Location :
Gaya,Bihar
First Published :
Apr 04, 2024 8:14 AM IST
मराठी बातम्या/देश/
छतावरुन पडला अन् कायमचं बंद झालं पंक्चर काढण्याचं काम, पण तो खचला नाही, आज स्वत:चा हा व्यवसाय सुरू











