...तर चंद्रकांत पाटलांवर दारोदारी फिरायची वेळ आली नसती, अजितदादांचा पठ्ठ्या पुन्हा नडला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Pune: प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपचे लहू बालवडकर हे राज्यात सर्वाधिक मतांनी जिंकून येतील, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले.
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे कॅबिनेट मंत्री दस्तुरखुद्द चंद्रकात दादा पाटील उतरले आहेत. भाजपने तिकीट न दिल्याने राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अमोल बालवडकर सध्या भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर तुटून पडतायेत. त्यांच्याच प्रभागात चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केला.
प्रभाग क्रमांक ९ मधून भाजपचे लहू बालवडकर हे राज्यात सर्वाधिक मतांनी जिंकून येतील, असे भाकीत चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले. तसेच हे भाकीत वर्तवताना त्यांनी आपली भविष्यवाणी नेहमी खरी ठरते असंही म्हटले.
...तर चंद्रकांत पाटलांवर दारोदारी फिरायची वेळ आली नसती
दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी आता पोपट घेऊन फिरायला हवे, असा उपरोधक टोला लगावत चंद्रकांत पाटलांचे राजकीय विरोधक, राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल बालवडकर यांनी त्यांना लक्ष्य केले. आपल्याला उमेदवारी दिली असती तर पाटलांवर अशी दारोदारी फिरायची वेळ आली नसती असे म्हणत बालवडकरांनी चंद्रकांत पाटलांना चांगलेच डिवचले.
advertisement
अजित पवार यांची अमोल बालवडकर यांना ताकद
भारतीय जनता पक्षाने युवा नेते अमोल बालवडकर यांचे ऐनवेळी तिकीट कापले. त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून त्यांनी भाजपविरोधात थेटपणे मोर्चा उघडला आहे. अजित पवार यांनीही महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे शहरातील पहिली सभा अमोल बालवडकर यांच्यासाठी घेऊन त्यांना ताकद देत असल्याचे थेटपणे दाखवून दिले.
advertisement
एका दादाने दूर ढकललं, दुसऱ्या दादांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला
कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी मागितली म्हणून माझ्यावर राग ठेवून माझी महापालिकेची उमेदवारी कापण्यात आली. तिकीट देतो म्हणून मला शेवटपर्यंत झुलवले. ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणले, त्यांच्याही डोळ्यात राहिलेल्या चार वर्षात अश्रू आणून बदला घेईन. एका दादाने दीड वर्ष माझ्या विरोधात कट कारस्थान केले पण दुसऱ्या दादाने (अजित पवार) दीड तासात माझा राजकीय पुनर्जन्म केला.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 7:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
...तर चंद्रकांत पाटलांवर दारोदारी फिरायची वेळ आली नसती, अजितदादांचा पठ्ठ्या पुन्हा नडला










