रुरकी - लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण असतो. कुटुंबातील सर्वजण, तसेच नातेवाईकही लग्नात आनंदी असतात. त्यामुळे काही ठिकाणी आनंदाच्या भरात लग्नादरम्यान, हवेत गोळीबारही केला जातो. मात्र, यातच एका लग्नादरम्यान, गोळीबार केल्याने एका 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यातील रुरकीमधील लालचंदवाला या गावात शनिवारी रात्री एका लग्नात ही घटना घडली. रियान वसीम असे 9 वर्षांच्या मृत मुलाचे नाव आहे. गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
रियानच्या मृत्यूमुळे याठिकाणी अत्यंत मोठी खळबळ उडाली. क्षणार्धात सर्व वातावरणच बदलुन गेले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी मृत मुलाचा मृतदेह हा ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुरकी रुग्णालयात पाठवला.
रात्री पडतात वाईट स्वप्नं, लग्नातही अडथळा, वेलची करेल मदत, फक्त करा हा महत्त्वाचा उपाय
पोलीस अधिकारी उपेंद्र सिंह यांनी सांगितले की, गोळी लागल्याने रियानचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याप्रकरणी सखोल चौकशी केली जात असून कुणी फायरिंग केली आणि का केली, याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आरोपींना पकडून त्यांनी त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.
