रात्री पडतात वाईट स्वप्नं, लग्नातही अडथळा, वेलची करेल मदत, फक्त करा हा महत्त्वाचा उपाय
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
अनेकांना रात्री विविध स्वप्ने पडतात. यामध्ये कधी चांगली तर काही स्वप्ने अत्यंत वाईटही असतात. यामुळे अनेकांची झोप मोड होते. तसेच अनेकांच्या लग्नात अडथळे आणि आर्थिक समस्याही असतात. त्यामुळे यावर नेमका काय उपाय आहे, हेच आपण जाणून घेऊयात. (परमजीतकुमार/देवघर, प्रतिनिधी)
advertisement
देवघरचे प्रसिद्ध ज्योतिषाचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, वेलचीमुळे घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते. तसेच सकारात्मक वातावरण घरात तयार होऊ शकते. तसेच या वेलचीमुळे आर्थिक समस्या दूर होऊ शकते. तसेच लग्नातील अडथळेही दूर होऊ शकतात.
advertisement
advertisement
advertisement
अनेक तरुण-तरुणींना आजकाल लग्नात अडचणी येत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे लग्न मोडले जाते. अशावेळी जातकाला गुरुवारी मंदिरात जाऊन पिवळे वस्त्र घालून नैवेद्य म्हणून हिरवी वेलची टाकून देवाला अर्पण करावी. तसेच स्वत:ही खावी. तसेच एखाद्या गरीब व्यक्तीला प्रसादासह वेलचीही दान करावी. तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील.
advertisement


