advertisement

Mumbai : काय सांगता! स्वस्त दरात 'फाईव्ह स्टार झोप', मुंबईतील 'या' स्टेशनवर उतरलं की लगेच आराम

Last Updated:

Sleeping Pods at Mumbai Railway : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. एका महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर नवी सुविधा सुरू होणार असून प्रवाशांना काही तास आराम करण्यासाठी सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.

मुंबईतील रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी लवकरच स्लीपिंग पॉड्स सुविधा उपलब्ध होणार.
मुंबईतील रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी लवकरच स्लीपिंग पॉड्स सुविधा उपलब्ध होणार.
मुंबई : मुंबईसारख्या महानगरात दररोज असंख्यजण कामानिमित्ताने राज्यातून येत असतात. पण इथं आल्यानंतर अशा लोकांसाठी निवासाचा पर्याय लवकर उपलब्ध होत नाही किंवा काहींना मिळतच नाही, अशासाठी आता या गर्दीच्या शहरात स्वस्त आणि सुरक्षित निवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
स्टेशनवर उतरलं की लगेच आराम
पश्चिम रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी आणि मुंबई शहरात निवासाची सोय होण्यासाठी अंधेरी या रेल्वे स्थानकावर स्लीपिंग पॉड्स सुरु करण्याचा निर्णय हाती घेतला आहे. या निर्णयामुळे काही तासांसाठी सुरक्षित पण आणि स्वस्त निवारा खरंच आवश्यक असलेल्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.या विशेष प्रकल्पासाठी अंधेरी स्थानकाच्या दुसऱ्या मजल्यावर अंदाजे 5,000 चौरस फुटांजी जागा राखून ठेवण्यात आलेली आहे.
advertisement
मुंबईत याआधी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर स्लीपिंग पॉड्स सुरु करण्यात आले होते आणि याला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभला होता. यामुळे आता अंधेरीत सुरु करणाऱ्या या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : काय सांगता! स्वस्त दरात 'फाईव्ह स्टार झोप', मुंबईतील 'या' स्टेशनवर उतरलं की लगेच आराम
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement