advertisement

'लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार'; 9 वर्षाच्या मुलीची आई असलेल्या पुण्यातील विवाहितेचा तरुणावर आरोप, कोर्टानं सुनावले खडे बोल

Last Updated:

९ वर्षांची मुलगी असलेल्या २८ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवणे प्रथमदर्शनी संशयास्पद असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

शारीरिक संबंधांनंतर बलात्काराचा आरोप फेटाळला (प्रतिकात्मक फोटो)
शारीरिक संबंधांनंतर बलात्काराचा आरोप फेटाळला (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: "लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले" अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये 'संमती' हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो. अशाच एका प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत २३ वर्षीय तरुणाचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. ९ वर्षांची मुलगी असलेल्या २८ वर्षीय विवाहित महिलेला लग्नाचे आमिष दाखवणे प्रथमदर्शनी संशयास्पद असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
काय आहे प्रकरण?
२८ वर्षीय विवाहित फिर्यादी महिलेने रितेश सुनील जाधव (वय २३) याच्याविरोधात १६ फेब्रुवारी रोजी बलात्काराची फिर्याद दिली होती. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या ८ महिन्यांपासून वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने केला होता. याप्रकरणी रितेशने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.
सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी या प्रकरणातील सर्व बाजू ऐकून घेतल्यावर सांगितले की, फिर्यादी ही एक प्रौढ आणि विवाहित महिला आहे. तिला आपल्या कृतीचे काय परिणाम होतील, याची पूर्ण जाणीव आहे. अशा परिस्थितीत २३ वर्षीय तरुणाने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिने त्यावर विश्वास ठेवला, हे तर्कसंगत वाटत नाही.
advertisement
वकिलांचा युक्तिवाद
तरुणातर्फे ॲड. आकाश सुधीर चव्हाण यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, "दोघांमध्ये गेल्या ८ महिन्यांपासून शारीरिक संबंध होते आणि त्यात कोणतीही जबरदस्ती नव्हती. हे संबंध पूर्णपणे परस्पर संमतीने झाले होते. जेव्हा वाद झाला, तेव्हा 'लग्नाचे आमिष' हा आरोप लावून गुन्हा दाखल करण्यात आला." ॲड. चव्हाण यांना ॲड. श्रुती रमेश कुंभार यांनी सहकार्य केले.
advertisement
न्यायालयाने हे मान्य केले की, जर एखादी व्यक्ती परिणामांची जाणीव असताना वारंवार संबंध ठेवत असेल, तर त्याला केवळ आमिषाचे नाव देऊन बलात्काराचा गुन्हा ठरवता येणार नाही. परिणामी, रितेश जाधव याची अटक न्यायालयाने रोखली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
'लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार'; 9 वर्षाच्या मुलीची आई असलेल्या पुण्यातील विवाहितेचा तरुणावर आरोप, कोर्टानं सुनावले खडे बोल
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement