संपूर्ण कुटुंबाने संपवलं जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बाघबहारा परिसरातील आहे. बाघबहारा येथील सरकारी क्वार्टरमध्ये सामूहिक आत्महत्येचं हे प्रकरण आहे. मृतकांची ओळख वसंत पटेल, त्यांची पत्नी भारती पटेल, मुलगी सेजल आणि मुलगा कियांश अशी पटली आहे. बसंत पटेल हे आदिवासी कल्याण विभागाच्या ब्लॉक ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते.
एक खोली आणि 4 जणांचा मृतदेह
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे. बसंत पटेल यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, तर त्यांची पत्नी भारती पटेल, मुलगी सेजल आणि मुलगा कियांश यांचे मृतदेह बेडवर आढळले. पत्नी आणि दोन मुलांनी विषारी पदार्थ प्राशन केले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
...पण हत्या की आत्महत्या
प्राथमिक अंदाज असल्याने या प्रकरणाची नोंद आत्महत्येची म्हणून केली जात आहे. बसंत हे आदिवासी कल्याण विभागाच्या ब्लॉक ऑफिसमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी तपास करत आहेत. आता शवविच्छेदन अहवालानंतरच ही आत्महत्या आहे की हत्या हे स्पष्ट होईल.
हे ही वाचा : 'या' पोरीला पिस्तूलसोबत Reel बनवणं पडणार महागात; VIDEO झाला व्हायरल, पोलिसांनी घेतली दखल
हे ही वाचा : रोज नवी बाईक, ब्रँडेड कपडे! पोलिसांनी आली शंका, चौकशी करताच स्टायलिश चोरांचा पर्दाफाश, वाचा सविस्तर