सुरुवातीला विहिरीत नग्न अवस्थेत मुंडकं नसलेला मृतदेह सापडल्यानंतर हा मृतदेह नक्की कुणाचा आहे, याची ओळख पटत नव्हती. मात्र दुसऱ्या एका विहिरीत माऊलीचं शीर सापडलं. कानात असलेल्या बाळीवरून तो माऊलीचाच मृतदेह असल्याची ओळख कुटुंबीयांनी पटवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. शिवाय हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा उलगडा देखील पोलिसांनी केला आहे.
advertisement
समलैंगिक संबंधातून हत्या
समलैगिंक संबधांतून ही हत्या झाल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे याचे गावातील एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते. ही बाब मयत माऊली गव्हाणेला समजली होती. याच कारणातून माऊलीची हत्या केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे. माऊली आपल्या समलैंगिक संबंधांची गावात वाच्यता करेन, या भीतीपोटी आरोपींनी दीड महिन्यापूर्वी कट शिजवला.
मुंडकं, हातपाय तोडून मृतदेहाची विल्हेवाट
६ मार्चला आरोपींनी माऊलीला भेटायला बोलावलं. यानंतर त्यांनी घोडनदीच्या नदीपात्रात असलेल्या विठ्ठल मांडगे यांच्या विहिरीवर नेलं. याठिकाणी आरोपींनी माऊलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर त्यांनी त्याचे सर्व अवयव कापून दोन वेगवेगळ्या विहिरीत मृतदेहाचा विल्हेवाट लावली. या हत्येनंतर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.
