जमुई : अनैतिक संबंधाच्या अनेक घटना सध्या समोर येत आहेत. तसेच यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने आपल्या पतीला जोरदार मारहाण केली. पतीने दुसरे लग्न केल्यामुळे पत्नीला भयंकर राग आला होता. यादरम्यान, पती हा पाटणा उच्च न्यायालयातून जामिनाचे कागदपत्र घेऊन जमुई येथील कुटूंब न्यायालयात पोहोचला होता. मात्र, याठिकाणी पतीसोबत धक्कादायक प्रकार घडला.
advertisement
काय आहे संपूर्ण घटना -
असे सांगितले जात आहे की, एका तरुणाने आपल्या पत्नीला सोडून दिले होते आणि पहिली पत्नीसोबत घटस्फोट न घेता त्याने दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. यामुळे त्याच्या पहिल्या पत्नीने पतीविरोधात तक्रारही दाखल केली. याप्रकरणी सुनावणीसाठी दोन्ही पती पत्नी न्यायालयात आले होते.
पत्नीने तक्रार दाखल केल्यावर पतीनेही जामिनासाठी याचिका दाखल केली आणि त्याचा त्याचा जामीनअर्ज स्विकारण्यात आला. यानंतर तो खुलेआम फिरत होता. मात्र, सोमवारी जेव्हा याप्रकरणाच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात आला, त्यावेळी त्याची नजर त्याच्या पहिल्या पत्नीवर पडली. यानंतर पत्नीने जे केलं, त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
आश्चर्यम…महिलेचं वय 20, एकाच वेळी दिला 5 मुलींना जन्म, अनेकांना विश्वासच बसेना!
ज्यावेळी तरुण न्यायालय परिसरात पोहोचला, त्यावेळी त्याठिकाणी त्याची पहिली पत्नी आधीपासून उपस्थित होती. मात्र, तिने आपल्या पतीला पाहताच तिचे नियंत्रण हरवले आणि तिने आपल्या पतीची कॉलर पकडत त्याला मारहाण केली. हा सर्व प्रकार पाहून याठिकाणी मोठी गर्दी जमा झाली आणि तेथील उपस्थित वकिलांनी तसेच स्थानिकांनी हे प्रकरण शांत केले. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
7 वर्षांपूर्वी लग्न झाले पण...
जमुई जिल्ह्यातील झाझा परिसरातील हरनी येथील रहिवासी असलेले विकास कुमारचे लग्न 7 वर्षांपूर्वी खैरा पोलीस ठाणे हद्दीतील ताराडीह गावातील रहिवासी असलेल्या तरुणीसोबत झाले होते. लग्नानंतर दोन्हीही खूप आनंदी होते. मात्र, त्यांना संतती होत नव्हती. संतती होत नसल्याने विकासने आपल्या पत्नीला सोडले. यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्याविरुद्ध जमुई कौटुंबिक न्यायालय आणि दिवाणी न्यायालयात तीन स्वतंत्र खटले दाखल करण्यात आले होते. या खटल्यांच्या सुनावणीदरम्यान त्याला जामीन मिळाला नाही. म्हणून या प्रकरणाबाबत पाटणा उच्च न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. यानंतर उच्च न्यायालयाने काही अटी ठेवत विकासला जामीन दिला.
सासू म्हणाली, सून दिवसभर टीव्ही अन् मोबाईलवरच असते, सूनेला आला राग, पतीसमोर ठेवली अनोखी अट
उच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर सोमवारी तो याबाबतची कागदपत्रे घेऊन जमई येथील न्यायालयात आला. मात्र, याठिकाणी त्याच्या पत्नीने त्याला जोरदार मारहाण केली. विकास हा झारखंड राज्यातील देवघर येथे राहून मजूरी करतो. मला सोडल्यानंतर विकास पत्नीसोबत राहत आहे, असा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. यानंतर मी तक्रार दाखल केली आहे, असेही तिने सांगितले.