सासू म्हणाली, सून दिवसभर टीव्ही अन् मोबाईलवरच असते, सूनेला आला राग, पतीसमोर ठेवली अनोखी अट
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
2020 मध्ये न्यू आग्रा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी तरुणीचे मथुरा येथील एका तरुणासोबत लग्न झाले होते. हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो.
हरिकांत शर्मा, प्रतिनिधी
आग्रा : अनेक ठिकाणी कौटुंबिक वादाच्या घटना समोर येत असतात. सासू सूनेचे भांडणंही होत असतात. अनेकदा सून वादामुळे माहेरी निघून जाते, असे दिसते. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
लग्नाच्या काही दिवसांनंतरच सूनेचे सासूसोबत भांडण झाले. यामध्ये सूनेने सासूमुळे सासर सोडले आणि माहेरी निघून गेली. आता तिने आपल्या पतीसमोर एक अनोखी अट ठेवली आहे. पत्नी आणि आई दोघांपैकी एकाचीच निवड करावी लागेल, अशी अट या सूनेने आपल्या पतीसमोर ठेवली आहे.
advertisement
सूनेचा आरोप -
रविवारी आग्रा पोलीस लाइनमध्ये असलेल्या पोलीस समुपदेशन केंद्रात ही घटना समोर आली आहे. 2020 मध्ये न्यू आग्रा पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी तरुणीचे मथुरा येथील एका तरुणासोबत लग्न झाले होते. हा तरुण एका खासगी कंपनीत नोकरी करतो. या प्रकरणात सूनेने आरोप केला आहे की, सासू दिवसभर व्यत्यय आणते. ना मोबाईलवर बोलू देते, ना टीव्हीवरच्या मालिका बघू देते. दिवसभर कामात गुंतवून ठेवते. तसेच टोमणेही मारते.
advertisement
सासूचा आरोप -
तर या प्रकरणात सासूनेही आरोप केला आहे. सासूने म्हटले आहे की, सूनेला जेवण बनवता येत नाही. तसेच काहीही शिकवायला गेले तर ऐकत नाही. दिवसभर मोबाईल आणि टीव्ही पाहण्यात गुंतलेली असते. यामुळे दोघांमध्ये भांडण झाले.
advertisement
पतीसमोर ठेवली अनोखी अट -
दरम्यान, या प्रकरणी समुपदेशक अमित गौड यांनी सांगितले की, समुपदेशनादरम्यान, दोन्ही बाजूच्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पत्नीने पतीसमोर अनोखी अट ठेवली आहे. पत्नी किंवा आई या दोघांपैकी एकाला निवडावे लागेल, असे तिने म्हटले आहे. तर मी एकुतला एक मुलगा आहे. मी माझ्या आईला सोडू शकत नाही, असे पतीने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढची तारीख देण्यात आली आहे. हे कुटुंब वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, असेही समुपदेशक अमित गौड यांनी सांगितले.
Location :
Agra,Uttar Pradesh
First Published :
May 07, 2024 7:39 AM IST
मराठी बातम्या/देश/
सासू म्हणाली, सून दिवसभर टीव्ही अन् मोबाईलवरच असते, सूनेला आला राग, पतीसमोर ठेवली अनोखी अट