हाताची नस कापून पतीचा जीव देण्याचा प्रयत्न
ही धक्कादायक घटना साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्यासमोर घडली. 31 वर्षीय नीलेश अरुण एटांबे हा पेरले (ता. कराड) येथे राहतो. त्याची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे त्याने हाताची नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा प्रकार त्याने पोलीस ठाण्याच्या दारात केला.
पोलिसांनी तातडीने नेलं रुग्णालयात
advertisement
नीलेश पोलीस ठाण्यासमोर असलेल्या झेंड्यासमोर आला. त्याने आपल्याजवळी ब्लेड काढले आणि डाव्या हाताची नस कापली. त्यामुळे त्याच्या हातातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यावेळी ही बाब पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल केले आणि त्याचा जीव वाचला.
पतीने पोलिसांनी दिलेलं कारण धक्कादायक
पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. पोलीस चौकशीत नीलेशने सांगितले की, माझी बायको मला सोबत राहू देत नाही. त्यामुळे मी हाताची नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हे ही वाचा : संशयाचं भूत डोक्यात शिरलं, पत्नी माहेरी जाताच मित्राला संपवलं; 2 भावांच्या कृत्याने इचलकरंजी हादरलं!
हे ही वाचा : चोरीचा प्रयत्न फसला; एक चोर सापडला, तर दुसरा चौथ्या मजल्यावरून पडला, साताऱ्यात घरफोडीचा थरार 'असा' घडला!