पतीन केली होती आत्महत्या
समोर आलेली माहिती अशी की, नंदू नागरगोजे आणि त्याची पत्नी स्वाती नागरगोजे यांचा विवाह काही दिवसांपूर्वीच झाला होता. ते पुण्यातील शेवाळवाडी येथे राहत होते. स्वाती गर्भवती होती, त्यामुळे ती आई-वडिलांकडे आली होती. तिने नुकताच बाळाला जन्मही दिला होता. पण 4 दिवसांपूर्वीच पती नंदूने पुण्यातील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
advertisement
पत्नीनेही संपवलं स्वतःला
पतीच्या जाण्याने फार मोठा धोका पत्नी स्वातीला बसला होती. पतीचा अत्यंविधी झाल्यानंतर स्वाती घरी आले. पण पतीचा मृत्यू तिला सहन झाला नाही, तिने आपल्या तान्ह्या बाळाला घरी झोपवले आणि गुरूवारी पहाटे घराजवळ्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आले, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवला.
हे ही वाचा : Satara News: 'लिंक ओपन केली अन्...', गटशिक्षणाधिकाऱ्याची उडाली झोप, लागला 'इतक्या' लाखांचा चुना!
हे ही वाचा : Karad News: अल्पवयीन लेकीची मिळाली साथ, बापाने सुरू केल्या घरफोड्या; पोलिसांनी कसा घेतला शोध?
