Karad News: अल्पवयीन लेकीची मिळाली साथ, बापाने सुरू केल्या घरफोड्या; पोलिसांनी कसा घेतला शोध?

Last Updated:

शहरातील वेगवेगळ्या परिसरात गेल्या 5 महिन्यांपासून घरफोड्या होत होत्या. मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका अशा ठिकाणी आत्तापर्यंत चोऱ्या झालेल्या आहेत. अखेर...

Karad News
Karad News
कराड : शहरातील वेगवेगळ्या परिसरात गेल्या 5 महिन्यांपासून घरफोड्या होत होत्या. मलकापूर, कोयना वसाहत, कार्वेनाका अशा ठिकाणी आत्तापर्यंत चोऱ्या झालेल्या आहेत. अखेर आरोपीला पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. या प्रकरणांचा सखोल चौकशी केली असता, एक धक्कादायक बाब समोर आली, ती म्हणजे या आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने या घरफोड्या केल्या होत्या.
5 महिन्यांत 14 लाखांचं चोरलं सोनं
पोसिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहरातील कोयना वसायत. कार्वेनाका आणि मलकापूर परिसरात मागील 5 महिन्यांपासून घरफोडीच्या घटना समोर आल्या होत्या. या चोऱ्या फेब्रुवारी 2025 ते जुलै 2025 दरम्यान करण्यात आल्या होत्या. अखेर त्या चोरट्यास पकडण्यात यश आले असून हा चोरटा आशाशिवनगर झोपडपट्टी, मलकापूर येथे राहणारा आहे. सलग काही चोरीच्या घटना घडल्यामुळे पोलिसांनी कसून तपास सुरू केला.
advertisement
अल्पवयीन मुलाची घेतली मदत अन् केल्या घरफोड्या
कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने CCTV फु़टेज, तांत्रिक विश्लेषण आणि इतर बाबींवर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर संशयित पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून 14 लाख 80 हजार रुपयांचा 18.5 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. या चोरट्याने चौकशीत सांगितले की, त्याच्या अल्पवयीन मुलीच्या मदतीने त्यांना आत्तापर्यंत 5 घरफोड्या केलेल्या आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Karad News: अल्पवयीन लेकीची मिळाली साथ, बापाने सुरू केल्या घरफोड्या; पोलिसांनी कसा घेतला शोध?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement