Satara News: 'लिंक ओपन केली अन्...', गटशिक्षणाधिकाऱ्याची उडाली झोप, लागला 'इतक्या' लाखांचा चुना!

Last Updated:

मोबाईलवर 'बॅंक ऑफ महाराष्ट्रा'च्या नावाने एक लिंक आली. गटशिक्षणाधिकारी असणाऱ्या व्यक्तीने ती लिंक ओपन केली, त्यावर एटीएमचा नंबर...

Cuber Crime
Cuber Crime
सातारा : मोबाईलवर 'बॅंक ऑफ महाराष्ट्रा'च्या नावाने एक लिंक आली. गटशिक्षणाधिकारी असणाऱ्या व्यक्तीने ती लिंक ओपन केली, त्यावर एटीएमचा नंबर टाकण्याची सूचना होती. तो त्यांनी टाकला आणि त्यानंतर त्यांच्या अकाऊंटमधून एका मागून एक असे तब्बल 8 लाख 10 हजार 266 रुपयांवर काढून मोठी फसवणूक करण्यात आली.
सायबर चोरट्यांना असा मारला डल्ला
समोर आलेली माहिती अशी की, तक्रारदार संजय श्रीरंग धुमाळ (वय-45, रा. गोडोली, सातारा) हे जावलीचे गटशिक्षणाधिकारी आहेत. त्यांना 7 मे 2025 रोजी व्हाॅट्सअपवर एक मेसेज आला. तो मेसेज बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या नावाने होते. तो मेसेज ओपन केल्यानंतर एपीके फाईल दिसली, ती त्यांनी ओपन केली. त्यात 16 अंकांचा त्यांचा एटीएम नंबर मागण्यात आला. तो त्यांनी दिला.
advertisement
टप्प्याने काढून घेतली रक्कम 
त्यानंतर पुन्हा 13 मे 2025 रोजी असाच एक मेसेज आला. त्यांनी तो ओपन केला, पुन्हा एपीके फाईल ओपन करून एटीएम नंबर दिला. यानंतर मात्र त्यांच्या बँक खात्यातून एक लाख, दीड लाख... अशी टप्प्याने रक्कम काढून घेण्यात आली. अशाप्रकार 8 लाख 10 हजार 266 रुपये आत्तापर्यंत काढून घेण्यात सायबर चोरटे यशस्वी झाले. शेवटी आपली फसवणूक झालीय, हे लक्षात येताच तक्रारदारांने पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसांकडे तक्रार केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Satara News: 'लिंक ओपन केली अन्...', गटशिक्षणाधिकाऱ्याची उडाली झोप, लागला 'इतक्या' लाखांचा चुना!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement