'या' लाॅजवर सुरू होतं भलतंच; पोलिसांना मिळाली टीप अन्... खंडाळ्यातून समोर आला 'मोठा कांड'

Last Updated:

सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा येथे महामार्गालगत मोनाली लाॅज आहे. याठिकाणी महिला आणि मुलींना जबरदस्तीने...

Crime News
Crime News
सातारा : 'खंडाळा येथील 'मोनाली लाॅज'वर वेश्या व्यवसाय सुरू आहे. तिथे काही महिला-मुली ठेवण्यात आहेत', अशी माहिती बुधवारी (दि. 13 ऑगस्ट) पोलिसांनी मिळाली. पोलिसांची तीन पथकं कामाला लागली आणि थेट लाॅजवर छापा टाकला. त्यात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांनी दिसून आले. तत्काळ पोलिसांना कारवाई सुरू केली. यात लाॅज चालक, मालक आणि कामगार असा 7 जणांवर गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर 6 महिलांची पोलिसांनी सुटका केली.
लाॅजवर छापा टाकला अन् 7 जणांना घेतलं ताब्यात
सविस्तर माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील पारगाव-खंडाळा येथे महामार्गालगत मोनाली लाॅज आहे. याठिकाणी महिला आणि मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात होते. यामध्ये राहुल वसंता श्रुंगारे (रा. स्टारसिटी शिरवळ, ता. खंडाळा), रावेश शेट्टी, मोहम्मद जावेद अख्तर, दत्ता राजू देवकर, हरिष वासुदेव शेट्टी, शुभम आप्पासो घुले आणि रंजनकुमार लक्ष्मण मल्लिक (सर्व. रा. मोनाली लाॅज, पारगाव-खंडाळा) अशी आरोपींची नावं आहेत.
advertisement
पोलिसांनी 6 पीडित महिलांची केली सुटका
या लाॅजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांनी त्वरित दखल घेतली. स्थानिक गुन्हे शाखा सातारा, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथक आणि खंडाळा पोलीस, अशी पथकं सज्ज झाली. थेट लाॅजवर पोलिसांनी छापा टाकला. छापा टाकताच वेश्यागमन व्यवसाय सुरू असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलांना ग्राहकांसाठी वेश्यागमन करण्यासाठी जबरदस्त केली जात होती. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि 6 पीडित महिलांची सुटका केली.
advertisement
मराठी बातम्या/क्राइम/
'या' लाॅजवर सुरू होतं भलतंच; पोलिसांना मिळाली टीप अन्... खंडाळ्यातून समोर आला 'मोठा कांड'
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement