काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे पूर्ण प्रकरण भीलवाडाचे वकील विकास व्यास (विजय सिंग पथिक नगर), दीपक जोशी (गुर्जर गली, आटूण) आणि त्याचा मित्र कमलेश आचार्य यांच्याशी जोडले गेले आहे. तीनही आरोपींनी 3 वर्षांपूर्वी नॅशनल सर्व समाज या नावाने राजकीय पक्षाची नोंदणी केली. तीनही आरोपी पक्षाच्या बँक खात्यात निधीची रक्कम घ्यायचे, त्यानंतर कमिशन कट करून रक्कम परत दिली जायची. काळा पैसा पांढरा करण्यासाठी हे सगळं सुरू होतं, असा दावा आयकर विभागाने केला आहे.
advertisement
आरोपी विकास व्यास हा पक्षाचा अध्यक्ष आहे. त्याच्या घरातून आयकर विभागाने अनेक कागदपत्र जप्त केली आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार नॅशनल सर्व समाज पार्टीने आतापर्यंत एकही निवडणूक लढलेली नाही. पक्षाच्या नोंदणीमध्ये विकास व्यास राष्ट्रीय अध्यक्ष, दीपक जोशी कोषाध्यक्ष आणि कमलेश आचार्य सचिव असल्याचं सांगण्यात आलं आहे. या तिघांनीच ही बनावट पदं बनवली होती.
तीनही आरोपींच्या घरी जयपूर-अजमेरच्या टीम वेगवेगळ्या कारवाई करत आहेत. तसंच आरोपींचीही चौकशी केली जात आहे.
मुंबईच्या फोन नंबरवर यायचा OTP
समोर आलेल्या माहितीनुसार विकासने बँक अकाऊंटची केवायसी भीलवाडामधून केली होती. पण हे अकाऊंट मुंबईमधून दुसरी व्यक्ती ऑपरेट करत होती. बँकेमध्ये व्यवहार झाल्यानंतर ओटीपी मुंबईमधल्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरवरच यायचा.
मागच्या 3 वर्षांमध्ये या अकाऊंटमधून तब्बल 271 कोटींचा व्यवहार झाला, त्यामुळे हे अकाऊंट आयकर विभागाच्या रडारवर आलं. दरम्यान याप्रकरणात वकील राहुल कोठारीही आयकर विभागाच्या रडारवर आला आहे, कारण त्यानेच पक्ष आणि विकास यांच्यात मध्यस्थी केली होती. बोगस क्लेममध्ये त्याचंही नाव आहे.
गाझियाबादमध्ये पक्षाचं ऑफिस
मंगळवारी भीलवाडामध्ये कारवाई करण्याआधी आयकर विभागाच्या टीम गाझियाबादमध्ये पक्षाच्या नोंदणीकृत कार्यालयातही पोहोचल्या, पण तिथे पक्ष कार्यालयाला कुलूप होतं. यानंतर आयकर विभागाने भीलवाडामध्ये तीनही आरोपींच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले.
14 जुलैला पहिली कारवाई
14 जुलैला भीलवाडाच्या संजय कॉलनीमध्ये राहणाऱ्या अकाऊंटंट राजकुमारच्या घरी पहिले कारवाई झाली. राजकुमारला आयकर विभागाची टीम येत असल्याचा संशय आला आणि तो तिथून पळून गेला. अकाऊंटट राजकुमार अकाऊंट्स, इनकम टॅक्स रिर्टन आणि कर सल्लागार आहे.
