मुस्ताकिम असं फाशीची शिक्षा झालेल्या ३८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. ते गुजरातच्या कापडवंज येथील मोहम्मद अली चौक परिसरातील रहिवासी आहे. २०२९ मध्ये त्याने कुवैतमध्ये आपल्या मालकीणीची निर्घृण हत्या केली होती. या हत्येप्रकरणी २०२१ मध्ये मुस्ताकीमला दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर मंगळवारी २८ एप्रिलला त्याला फासावर लटकवण्यात आलं. बुधवारी त्याचा मृतदेह अहमदाबादला आणण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर इस्लामिक रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुस्ताकिम हा मागच्या दशकाहून अधिक काळ आखाती देशांमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत होता. अलीकडेच राजस्थानातील बांसवाडा येथील एका जोडप्याने त्याला रेहाना खान आणि मुस्तफा खान यांच्या घरी नोकरीसाठी कुवैतला नेले. चार वर्षांपूर्वी वाद निर्माण होईपर्यंत तो तिथेच राहत होता आणि काम करत होता. मीडिया रिपोर्टनुसार, मुस्ताकिमचा त्याच्या मालकाशी मतभेद होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर याला हिंसक वळण लागलं. २०१९ मध्ये मुस्ताकिमने रेहाना खानची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली.
यानंतर मुस्ताकिमवर मालकाच्या कुटुंबाने हत्येचा आरोप केला होता. कुवैती पोलिसांनी त्याला अटक केली होती. २०२१ मध्ये, कुवैतमधील न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं आणि मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर २८ एप्रिल रोजी त्याला फाशी देण्यात आली. या शिक्षेबद्दल भारतीय दूतावासाने मुस्ताकिमच्या कुटुंबीयांना कल्पना दिली होती. फाशीची शिक्षा झाल्यानंतर मुस्ताकिमचा मृतदेह भारतात आणण्यात आला.
