मृत तरुणाचे नाव केविन सेल्वा गणेश (27) आहे. तो चेन्नई येथील एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत इंजिनीअर म्हणून काम करीत होता. केटीसी नगर येथील सिद्धा रुग्णालयामध्ये कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या तरुणीशी त्याचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते.
गर्लफ्रेंडच्या भावावर विश्वास ठेवला अन्...
रविवारी तो त्याच्या आजोबांच्या प्रकृतीबाबत सल्ला घेण्यासाठी या तरुणीला भेटायला गेला होता. तेव्हा या तरुणीचा भाऊ एस. सुरजित (21) याने केविनला घरी बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून केविन त्याच्यासोबत गेला. मात्र, वाटेत सुरजितने अचानक त्याची दुचाकी थांबवून एक कोयता काढला आणि केविनवर अंदाधुंद हल्ला केला.
advertisement
केविनने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, सुरजितने त्याचा पाठलाग करून त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी सुरजितला सोमवारी अटक करून रिमांड देण्यात आला.
आरोपीच्या आई-वडिलांनी आखला कट?
आरोपी सुरजितचे आई-वडील पोलीस उपनिरीक्षक त्याच्या आहेत. सुरजितसह आई-वडिलांवर बीएनएस आणि एससी/एसटी (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. तामिळनाडूमध्ये ऑनर किलिंगच्या नावाखाली आणखी एका तरुणाची हत्या झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
