हल्लेखोरांनी ट्रक चालकावर एकूण ६ गोळ्या झाडल्या. ट्रक चालक सन्नीची हत्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप समोर आलेलं नाही. स्थानिक लोकांमध्ये मात्र या घटनेने भीतीचं वातावरण निर्माण जालं आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन रिकाम्या पुंगळ्या सापडल्या आहेत.
ट्रकचे मालक संजू वाजपेयी यांनी सांगितलं की, रविवारी सकाळी सन्नी माझ्याकडे आला आणि ट्रक घेऊन गेला. त्यानंतर ११ वाजता मला सन्नीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची माहिती समजली.
advertisement
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. डोक्यात गोळ्या झाडल्याने डोक्यातून रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला. शरिरावरही रक्ताचे डाग होते. पोलीसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
सन्नी बारीडीह इथं राहणारा असून तो रविवारी गॅरेजमध्ये गाडी तयार करून घेत होता. त्याचवेळी दुचाकीवरून हल्लेखोर आले आणि त्यांनी जवळून सन्नीवर गोळ्या झाडल्या. सन्नीची हत्या का केली गेली? या प्रश्नाचे उत्तर पोलीस शोधत आहेत. सन्नीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या आहेत.
