TRENDING:

Crime News : कोमल निघाली बेवफा! 5 वरांशी केले लग्न, हनिमूनही साजरा केला पण.. घटनेने राज्यात खळबळ

Last Updated:

Crime News : कर्नाटकातून लग्नाच्या नावाखाली 2 राज्यातील लोकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली लुटमार आणि फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कर्नाटक : लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. लग्न जमवण्यासाठी मुलीच्या घरच्यांना पैसे देणं, लग्न जमवणाऱ्या एजंटला पैसे देणं व लग्नानंतर नववधू घरातले दागिने आणि पैसे घेऊन पळून गेल्याच्या घटना वाढत आहेत. अशीच घटना कर्नाटकमध्ये घडली होती. कर्नाटकातल्या गुब्बी पोलिसांकडे याबाबत तक्रार येताच फसवणूक करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश त्यांनी केलाय.
नवरीला अटक (प्रतिकात्मक फोटो)
नवरीला अटक (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

गुब्बी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टोळीत सामील असलेल्या एका महिलेनं एक-दोन नव्हे, तर पाच जणांशी लग्न करून त्यांची फसवणूक केली. याबाबत पोलिसांकडे सातत्यानं तक्रारी येत होत्या. अखेर टोळीतल्या वधूसह तिच्या दोन साथीदारांना आणि लग्न जमवणाऱ्या दलालाला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. कर्नाटकबरोबरच महाराष्ट्रातही या टोळीनं काहीची फसवणूक केलीय.

2023मध्ये पोलिसांकडे आली होती तक्रार

advertisement

या प्रकरणी कृषी तज्ज्ञ पलक्षैया यांनी नोव्हेंबर 2023मध्ये गुब्बी पोलिसांकडे तक्रार केली होती. पलक्षैया यांचा मुलगा दयानंद याचं लग्न कोमल नावाच्या मुलीशी ऑक्टोबर 2023मध्ये झाले होते. पलक्षैया यांचा मित्र बसवराजू याने त्यांची लक्ष्मी नावाच्या महिलेशी ओळख करून दिली होती. ती मॅरेज एजंट असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. लग्न ठरल्यानंतर कोमल तिच्या साथीदारांसोबत पलक्षैया यांच्या घरी आली होती. त्या वेळी सिद्धप्पा आणि लक्ष्मी शंभूलिंगाही उपस्थित होते. या दोघांनी स्वतःला कोमलचे मामा आणि मामी असल्याचं सांगितलं होतं. त्या वेळी पलक्षैया यांनी लक्ष्मीला लग्न जमवण्याची रक्कम म्हणून अडीच लाख रुपये दिले.

advertisement

तसंच कोमलला साडी आणि दागिने घेण्यासाठी पैसेही दिले. त्यानंतर कोमलला मंगळसूत्र आणि सोन्याचे कानातले दिले होते. लग्नानंतर तीन दिवसांनी कोमल हुबळीला माहेरी जात असल्याचं सांगून पलक्षैया यांच्या घरातून निघून गेली. त्यानंतर तिनं मोबाइल बंद करून ठेवला. पलक्षैया हे हुबळी येथे सिद्धप्पा यांच्या घरी गेले असता त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. अखेर त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती.

advertisement

वाचा - बदलापूर घटनेची जखम ताजी असतानाच नायगावमध्ये पुनरावृत्ती; अवेरनेस कँपमध्ये उघड

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून, संबंधित टोळीला पकडलं आहे. या टोळीनं आणखी चार जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. यामध्ये महाराष्ट्रात मिरजमध्ये राहणाऱ्या तरुणाचादेखील समावेश आहे. या टोळीतले काही जण फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Crime News : कोमल निघाली बेवफा! 5 वरांशी केले लग्न, हनिमूनही साजरा केला पण.. घटनेने राज्यात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल