कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी दावा केला आहे, की हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळल्यानंतर डॉ. देवाशीष गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित होते. एवढंच नाही, तर पोस्टमॉर्टेमच्या वेळीदेखील ते उपस्थित होते.
अख्तर अली यांनी सांगितलं, की देवाशीष शोम हे पश्चिम बंगाल आरोग्य भरती मंडळाचे सदस्य आहेत. पूर्वी ते आर. जी. कर हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागाचे एचओडी होते. सध्या त्यांचा आर. जी. कर हॉस्पिटलशी कोणताही संबंध नाही. त्यांच्याच काळात औषधांच्या खरेदी-विक्रीत हेराफेरी होत असल्याचा आरोप झाला होता. हॉस्पिटलमधल्या कॅफेटेरियाचा मालक चंदन लौह हा माजी प्राचार्य संदीप घोष यांचा अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी होता. हॉस्पिटलमधल्या भ्रष्टाचारात त्यांचाही हात असल्याचा दावा अख्तर अली यांनी केला आहे.
advertisement
वाचा - क्राइम पेट्रोल पाहून केला प्लॅन, 3 वर्षांच्या चिमुकलीचा आईनंच गळा चिरला अन्...
काय आहे प्रकरण?
9 ऑगस्ट रोजी आर. जी. कर रुग्णालयातल्या सेमिनार हॉलमध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. 8 ऑगस्टच्या रात्री कर्तव्यावर असताना डॉक्टरचा निर्घृण खून करण्यात आला होता. खून करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाला होता. या प्रकरणी संजय रॉय नावाच्या व्यक्तीला अटक झाली आहे. पीडितेला 16 बाह्य आणि 9 अंतर्गत जखमा झाल्याचं पोस्टमॉर्टेममध्ये आढळलं होतं. सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणात असं दिसलं आहे, की संजय रॉय 9 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजून तीन मिनिटांनी इमारतीत घुसला होता. 8 ऑगस्ट रोजी तो चेस्ट विभागात गेला होता आणि पीडित डॉक्टर आणि इतर व्यक्तींची पाहणी करत होता. 33 वर्षांचा संजय रॉय 2019 पासून कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता.