महाकुंभमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड प्रकरणात लातूरमधून प्रज्वल अशोक तेली नावाच्या विकृताला लातूरमधून अटक केली आहे. हा विकृती प्रज्वल सोशल मीडियावर व्हिडीओ विकत होता.
गुजरातमधील एका हॉस्पिटलमधील महिलांचे तपासणी करतानाचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आणि हे व्हिडिओ लातूरमध्ये मेडिकल 'नीट' परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रज्वल तेली या युवकाने आर्थिक व्यवहार करून लातूरमधून अपलोड केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. मूळचा सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील प्रज्वल तेली याने काही अश्लिल व्हिडिओ हे यू-ट्यूब आणि टेलिग्राम या सोशल मीडियावर लातूरमधून अपलोड केल्याचं उघड झालं आहे.
advertisement
गुजरात राज्यातील राजकोट येथील सायबर पोलिसांनी लातूर शहरातील नारायण नगर भागातून प्रज्वल तेलीला अटक केली होती. पोलिसांची त्याची कसून चौकशी केली असता आणखी धक्कादायक बाबी उघड झाल्या. हा विकृत सोनोग्राफी, प्रसूती कक्ष तसंच तपासणीसाठी आलेल्या महिलांचे आक्षेपार्ह, अश्लिल व्हिडिओ/ सीसीटीव्ही व्हिडीओ गोळा करायचा आणि यूट्यूब-टेलिग्रामच्या माध्यमातून विकायचा. प्रयागराज येथील मुख्य आरोपी चंद्रप्रकाश फुलचंद याला अटक केल्यानंतर हा सगळा गलिच्छ प्रकार पुढे आला
प्रज्वलचं घाणरेडं डोकं
प्रज्वल हा अनेक व्हिडीओ गोळा करायचा. त्याचं त्याने एक मेनू कार्ड सुद्धा बनवलं होतं. यामध्ये जवळपास २२ वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ होते. यामध्ये
हॉस्पिटल, गंगा नदी, मॉल आणि लग्नात सुद्धा महिलांचे व्हिडीओ तो रेकॉर्ड करायचा. आरोपी प्रज्वल तेलीने हे व्हिडीओ विकून 7 ते 8 लाख रुपये कमावले होते. हा विकृत मागील दोन महिन्यांपासून हेच काम करत होता.
प्रीमियम व्हिडीओ २००० रुपयांना !
आणखी एका आरोपीला अटक केली आहे, त्याचं नाव चंद्रप्रकाश असून तो प्रयागराज इथं राहणार आहे. या चंद्रप्रकाश हा एका युट्यूब चॅनल चालवत होता. कुंभमध्ये आलेल्या महिला आणि लोकांचे फोटो आणि व्हिडीओ तो युट्यूबवर अपलोड करायचा. चंद्रप्रकाशने यूट्यूबवर फ्री व्हिडीओ गोळा करायचा आणि युट्यूबवर अपलोड करायचा. काही तरुणांकडून असे अश्लिल व्हिडीओची मागणी होत असल्यामुळे चंद्रप्रकाशने युट्यूब चॅनल सुरू केलं. पोलिसांनी सांगितलं की, हॅकिंग केल्यानंतर सामान्य आणि प्रीमियम व्हिडीओचे त्याने ग्रुप तयार केले. एका व्हिडीओची किंमतही ५०० रुपये इतकी ठेवली होती. एवढंच नाहीतर हॅकर हे वेगवेगळे सीसीटीव्ही हॅक करत होते आणि त्यातून व्हिडीओ रेकॉर्ड करून विकत होते.