वारंवार समजावून सांगून नाही ऐकलं
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुबोध कुमार सिन्हा हा बिहारचा रहिवासी असून कोरबा येथील रविशंकर नगरमध्ये भाड्याच्या घरात राहतो. तो पातरी येथे असलेल्या अदानी पॉवर प्लांटमध्ये काम करतो. आरोपीला पीडितेचा नंबर तिसऱ्या व्यक्तीकडून मिळाला होता. त्यानंतर तो तिला सतत फोन करून त्रास देत होता. मुलीने त्याला अनेकवेळा समजावले, पण आरोपीने त्याचे कृत्य थांबवले नाही.
advertisement
पोलीस घेताहेत शोध
अखेरीस, त्रस्त झालेल्या मुलीने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अदानी पॉवर प्लांटमधून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अश्लील बोलणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, पीडितेचा नंबर आरोपीला कोणी आणि का दिला, याचाही शोध घेत आहेत.
हे ही वाचा : आई, वडील, बहीण आणि आत्या... सगळ्यांची केली हत्या; यूट्यूब व्हिडीओ पाहून केला कांड, आता...
हे ही वाचा : बाप रे... ही तर चोरांची कंपनी! पूजा करून टाकायचे डाका, चोरीचा 'फाॅर्म्युला' ऐकून पोलिसही चकित