गोरखपूरच्या रामगढ ताल परिसरात विवेकपुर इथं ही घटना घडली. लखनऊत राहणारे हिमांशु सिंह यांची गाडी चार दिवसांपूर्वी चोरीला गेली. १७ डिसेंबरला ते सासरवाडीत पोहोचले होते. त्यावेळी दारात गेटजवळ फॉर्च्युनर गाडी लावली होती. पण सकाळी उठून पाहिलं तर दारात गाडी नव्हती.
crime : 'कालिमाता तुझा नाश करेल.' बायकोनं पतीला दिला शाप आणि सोडलं घर, असं काय घडलं दोघांमध्ये?
advertisement
गाडी शोधण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर एका महिलेने गाडी चोरल्याचं समोर आलं. महिला तिच्यासोबत लॅपटॉप घेऊन आली होती. तिने ट्रॅक सूट आणि मास्क घातलेला. कोणत्यातरी डिव्हाइसचा वापर करून सहज गाडीचं लॉक तोडलं आणि गाडीत बसून ८ मिनिटात निघून गेली. या घटनेवेळी सीसीटीव्हीत आणखी एक महिलासुद्धा दिसते. पोलिसांना संशय आहे की ती आरोपीची सहकारी आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कृष्ण कुमार विश्नोई यांनी म्हटलं की, स्मार्ट डिव्हाइस वापरून गाडी चोरी केली आहे. यात जुनी चावी डिसेबल करून नव्या चावीच्या मदतीने गाडीचं लॉक उघडून चोरी केली जाते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चौकशी सुरू आहे.
