हाफिजगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. किराणा व्यवसाय करणाऱ्या पवन गुप्ता नावाच्या व्यक्तीचे गेल्या तीन वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. तरुणीने त्याच्याकडून काहीही मागितलं तरी पवन तिची प्रत्येक मागणी पूर्ण करायचा. मात्र, काही काळापूर्वी व्यावसायिकाच्या पत्नीला याची माहिती मिळाली. घरात बराच गदारोळ झाला. किराणा व्यापाऱ्याने पत्नीला वचन दिलं, की तो मुलीशी कधीही बोलणार नाही.
advertisement
पण दुसरीकडे प्रेयसीला हे नातं संपवायचं नव्हतं. म्हणूनच ती रोज त्याला भेटायला जायची. पवन गुप्ता पत्नी आणि गर्लफ्रेंडमध्ये अडकला होता. त्यामुळे त्याने प्रेयसीला सोमवारी भेटण्यास बोलवलं. त्याची गर्लफ्रेंड त्याला भेटायला आली. ती गाडीत बसताच व्यावसायिकाची पत्नी तिथे आधीच बसलेली होती. व्यावसायिकाने आपल्या गर्लफ्रेंडला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती काही ऐकायला तयार नव्हती.
प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासत होता TC; GRP ने विचारताच दाखवू लागला आयडी कार्ड, सत्य समजताच अधिकारीही शॉक
व्यावसायिकाने सांगितलं- 'मी कारमध्ये माझ्या गर्लफ्रेंडला समजावून सांगत होतो, तेव्हा तिने भांडण सुरू केलं. ती मला खोट्या प्रकरणात अडकवण्याच्या धमक्या देऊ लागली. त्यामुळे माझ्या पत्नीने तिला चापट मारली. प्रेयसी आणि पत्नीमध्ये भांडण सुरू झालं. मला राग आल्यावर मी माझ्या गर्लफ्रेंडच्या हातावर काठीने मारलं. तिला दुखापत झाल्यावर ती गाडीतून बाहेर आली आणि पळू लागली. मग मी तिच्या मागे गेलो आणि तिच्या डोक्यावर अनेक वार केले. यामुळे तिचा तिथेच मृत्यू झाला. मग आम्ही तिथून पळ काढला.'
मुलीच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दुसऱ्या दिवशी मुलीचा मृतदेह सापडला. मोबाईल डिटेल्सवरून समोर आलं की, मुलीचं शेवटचं किराणा व्यावसायिकाशी बोलणं झालं होतं. पोलिसांनी सांगितलं, की आम्ही आरोपीला अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. व्यावसायिकाची पत्नी अद्याप फरार आहे. तिचा शोध सुरू आहे. लवकरच तिलाही अटक करण्यात येईल.