प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासत होता TC; GRP ने विचारताच दाखवू लागला आयडी कार्ड, सत्य समजताच अधिकारीही शॉक

Last Updated:

प्लॅटफॉर्म ड्युटीवर तैनात टीसी विश्वामित्र यांना प्लॅटफॉर्म क्रमांक-4 वर टीटीई गणवेश घातलेला एक व्यक्ती दिसला. तो प्रवाशांची तिकीटं तपासत होता.

बनावट टीसीला अटक
बनावट टीसीला अटक
जयपूर : ट्रेनने प्रवास करताना तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की टीसी येऊन प्रवाशांची तिकीटं चेक करतात. हे तिकिट फक्त ट्रेनमध्येच लागतं असं नाही तर अगदी प्लॅटफॉर्मवर तुम्ही कोणाला सोडण्यासाठी आला असाल तरी तुमच्याकडे प्लॅटफॉर्मवर तिकीट असणं गरजेचं आहे. त्यामुळे इथेही टीसी तुमचं तिकीट तपासू शकतात. तुमच्याकडे तिकीट नसेल तर दंड आकारण्यात येतो. मंगळवारी जयपूर स्टेशनवरील प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची तिकीटं तपासताना आरपीएफने बनावट टीसीला पकडलं.
चौकशीत आरोपीने आपलं नाव रिंकू असल्याचं उघड केलं. तो शिवपुरीचा रहिवासी असल्याचंही सांगण्यात आलं. त्याच्याकडून बनावट ओळखपत्रही सापडलं. जीआरपीने त्याला अटक केली आहे. प्लॅटफॉर्म ड्युटीवर तैनात टीसी विश्वामित्र यांना प्लॅटफॉर्म क्रमांक-4 वर टीटीई गणवेश घातलेला एक व्यक्ती दिसला. तो प्रवाशांची तिकीटं तपासत होता.
advertisement
विश्वामित्राला पाहताच तो बनावट टीसी घाबरला आणि पळून जाऊ लागला. दरम्यान, प्लॅटफॉर्मवर गस्त घालत असलेले आरपीएफचे एएसई नत्थी सिंह आणि कॉन्स्टेबल भीम सिंह यांनी तत्परता दाखवत त्याला पकडलं. विश्वामित्र यांनी लगेच जयपूर जंक्शन सीटीआय समीर शर्मा, हेड टीसी शक्ती शर्मा आणि विद्या देवी यांना याची माहिती दिली.
आयजी ज्योती कुमार सतीजा आणि कमांडंट भवप्रीत सोनी यांनी सांगितलं की, आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर आरपीएफ दक्षता मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत बनावट टीटी पकडण्यात आला आहे. आरोपीकडे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, पश्चिम मध्य रेल्वेचे बनावट कार्ड सापडले. आरपीएफने गुन्हा दाखल करून आरोपीला जीआरपीच्या ताब्यात दिलं आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
प्लॅटफॉर्मवर तिकीट तपासत होता TC; GRP ने विचारताच दाखवू लागला आयडी कार्ड, सत्य समजताच अधिकारीही शॉक
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement