नायगाव मधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील उपहागृहात काम करणार्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने दुसरीत शिकणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुकलीवर 4 ते 5 वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बदलापूर घटनेनंतर नायगाव पोलिसांनी प्रत्येक शाळेत गुड टच, बॅड टच हे जनजागृती कॅम्प घेतले असता पीडित मुलींनी आपल्या शिक्षिकेला ही घटना सांगितल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे.
advertisement
वाचा - आधी बेदम मारहाण मग दिले गरम चाकूने गुप्तांगावर चटके, वसईत आईकडून मुलांचा छळ
याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात विनयभंग, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलाला अटक करून रिमांड होममध्ये रवाना केले आहे. अल्पवयीन आरोपीने मुलगी वॉश रूम, हॅन्ड वॉश करायला जाताना पीडित मुलीला स्पर्श करणे, नको त्या ठिकाणी हात लावणे हे प्रकार करीत होता. ही घटना उघड झाल्यानंतर पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
