TRENDING:

Shocking News: अभ्यासावरुन आई आणि मुलीचं वाजलं; भांडणाचा शेवट भयानक, दोघींनी गमावला जीव

Last Updated:

हायस्कूलच्या परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही त्याच घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कोलकाता : आजकाल पालक आपल्या मुलांवर अभ्यासासाठी खूप दबाव टाकतात. आपल्या मुलांनी अभ्यास करून मोठं व्हावं, असं त्यांना वाटतं. मात्र, दुसरीकडे मुलं देखील कधीकधी रागाच्या भरात धक्कादायक पाऊल उचलतात. पालकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विचार करण्याऐवजी ते नाराज होतात आणि नको ते पाऊल उचलतात. पश्चिम बंगालमधील हावडा येथे अशीच एक घटना घडली आहे. यात हायस्कूलच्या परीक्षा सुरू होण्याच्या दोन दिवस आधी एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोघींनी घेतला गळफास (प्रतिकात्मक फोटो)
दोघींनी घेतला गळफास (प्रतिकात्मक फोटो)
advertisement

मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच आईनेही त्याच घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हावडा येथील बोटॅनिकल गार्डन पोलीस ठाण्याच्या परिसरात मंगळवारी ही घटना घडली. या विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांना आणि स्थानिक नागरिकांना या घटनेबाबत ऐकून मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

crime news : नवरा आणि लेकरांना सोडलं, प्रियकरासोबत पळाली; नंतर 20 वर्षांच्या मुलासोबत थाटला संसार, पण शेवटी...

advertisement

स्थानिक आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी हायस्कूलच्या विद्यार्थीनीचा लटकलेला मृतदेह घरात सापडला. कुटुंबीयांना विद्यार्थीनी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तिला तात्काळ खाली उतरवलं आणि रुग्णालयात नेलं. मात्र, डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच मुलीच्या आईला हे दु:ख सहन झालं नाही. मुलीने ज्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती त्याच दोरीने आईनेही तिथेच गळफास घेऊन आत्महत्या केली.

advertisement

या घटनेनंतर पोलिसांनी येऊन महिलेचा मृतदेहही बाहेर काढला. विद्यार्थीनीच्या कुटुंबीयांशी बोलल्यानंतर पोलिसांनी शाळेच्या परीक्षेच्या तयारीवरून विद्यार्थिनीचा तिच्या आईसोबत वाद झाल्याचा अंदाज व्यक्त केला. परीक्षेत चांगले मार्क्स न मिळण्याच्या भीतीने तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर मुलीच्या बातमीची बातमी ऐकताच महिलेनेही धक्कादायक पाऊल उचललं. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

advertisement

मराठी बातम्या/क्राइम/
Shocking News: अभ्यासावरुन आई आणि मुलीचं वाजलं; भांडणाचा शेवट भयानक, दोघींनी गमावला जीव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल