आज सकाळी झालेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. साठ्ये महाविद्यालय मुंबईतील प्रख्यात महाविद्यालयांपैकी एक आहे. सकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. संध्याने एवढं टोकाचे पाऊल उचलण्याबाबत नेमकं काय घडलं, याचा अद्याप उलगडा झाला नाही.
आत्महत्या की अपघात?
संध्याचा मृतदेह गुरुवारी सकाळी साठ्ये महाविद्यालयाच्या आवारात आढळून आला. तिला तात्काळ बाबासाहेब गावडे चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
advertisement
प्राथमिक तपासात ती कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याचं समोर आलं आहे. मात्र, ही आत्महत्या की अपघात यावर अजूनही संभ्रम कायम आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि कॉलेज प्रशासनाचा दावा
पोलिसांनी तपासादरम्यान कॉलेजचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्यामध्ये संध्या तिसऱ्या मजल्यावरील कॉरिडोरमध्ये फिरताना दिसत आहे. कॉलेज प्रशासनाने संध्याच्या कुटुंबीयांना ही अपघाती घटना असल्याचं सांगितलं, मात्र कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येची चर्चा सुरू आहे.
कुटुंबीयांना वेगळाच संशय..
संध्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी मात्र याबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. “संध्या सहजपणे आत्महत्या करू शकत नाही. तिला कोणीतरी ढकललं असावं,” असा आरोप संध्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात, याचा तपास आता विलेपार्ले पोलीस करत आहेत.
सध्या पोलीस कॉलेज प्रशासन, विद्यार्थी आणि स्टाफची चौकशी करत आहेत. संध्याची मानसिक अवस्था, मागील काही दिवसांतील वर्तन यावरही चौकशी सुरू आहे. पोलिसांकडून घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपास अहवालाची प्रतीक्षा आहे.
