TRENDING:

व्यक्ती नव्हे, 'हा' तर हैवान! 191 मृतदेहांसोबत केले घृणास्पद कृत्य, इतकंच नाही राखेऐवजी द्यायचा सिमेंट!

Last Updated:

अमेरिकेतील कोलोराडो राज्यात 'रिटर्न टू नेचर फ्युनरल होम' या अंत्यसंस्कार गृहाचा मालक जॉन हाल्फोर्ड याला 191 मृतदेहांशी अमानवी व्यवहार केल्याप्रकरणी 20 वर्षांचा...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमेरिकेतील कोलोरॅडोमध्ये एका अंत्यसंस्कार विधी करणाऱ्या व्यक्तीने असे कृत्य केले, ज्याने माणुसकीला लाज आणली. या अंत्यसंस्कार विधी करणारा व्यक्ती मृतदेहांवर अंत्यसंस्कार न करता त्यांच्या नातेवाईकांना बनावट राख पाठवत असे. पण म्हणतात ना, कायद्याचे हात लांब असतात आणि कधीतरी कायदा गुन्हेगाराला पकडतोच. या प्रकरणातही तेच झाले. त्याचे घृणास्पद कृत्य उघड झाले आणि अमेरिकन न्यायालयाने त्याला कठोर शिक्षा सुनावली. जॉन हॅलफोर्ड नावाच्या व्यक्तीला 191 मृतदेहांशी अमानवी वर्तन केल्याबद्दल आणि कुटुंबीयांची फसवणूक केल्याबद्दल अमेरिकन न्यायालयाने 20 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. हे प्रकरण केवळ फसवणुकीचे नव्हते, तर त्याने माणुसकी आणि मानवी भावनांना चिरडून टाकले.
Crime News
Crime News
advertisement

राखेऐवजी द्यायचा सिंमेट पावडर

हॅलफोर्ड त्याची पत्नी कॅरीसोबत ‘रिटर्न टू नेचर फ्यूनरल होम’ चालवतो. 2019 ते 2023 दरम्यान शेकडो मृतदेह येथे सडण्यासाठी ठेवण्यात आले होते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे ज्या कुटुंबीयांनी आपल्या प्रियजनांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी या व्यक्तीकडे दिले, त्यांना राखेऐवजी कोरडी सिमेंट पावडर देण्यात आली. हे प्रकरण कोलोरॅडो न्यायालयात आले, तेव्हा न्यायाधीश नीना वांग यांनाही धक्का बसला. त्या म्हणाल्या, “हा कोणताही सामान्य फ्रॉड नाही, ही भावना, कुटुंब आणि सन्मानाची पायमल्ली आहे, ज्याचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही.” त्यांनी जॉन हॅलफोर्डला या प्रकरणात शक्य असलेली कमाल शिक्षा, म्हणजेच 20 वर्षांची शिक्षा सुनावली.

advertisement

घरात सडलेल्या मृतदेहांचा खच

हे अंत्यसंस्कार घर पेनरोज नावाच्या एका लहान शहरात होते, जे कोलोरॅडोमधील डेन्व्हरपासून सुमारे 100 मैल (160 किलोमीटर) दूर आहे. 2023 मध्ये पोलिसांना एक फोन आला. फोन करणारा केवळ ‘भयंकर वास’ येत असल्याची तक्रार करत होता. जेव्हा तपासकर्ते पोहोचले, तेव्हा त्यांनी जे पाहिले ते खूप भयानक होते. खोल्यांमध्ये मृतदेह इतक्या घट्टपणे रचलेले होते की उभे राहायलाही जागा नव्हती. एफबीआयला मृतदेहांमधून बाहेर पडणारे द्रव थांबवण्यासाठी लाकडी फळ्या टाकाव्या लागल्या.

advertisement

कुटुंबीयांचा विश्वासघात

तपासात हेही उघड झाले की, काही प्रकरणांमध्ये मृतदेहांवर चुकीच्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, दोन कुटुंबांना त्यांच्या नातेवाईकांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाचीतरी राख देण्यात आली. जॉन आणि त्याची पत्नी कॅरी हॅलफोर्ड यांना केवळ मृतदेहांवर गैरवर्तन केल्याबद्दलच दोषी ठरवण्यात आले नाही, तर या जोडप्याने अमेरिकेच्या सरकारला कोविड मदत निधीमध्ये 9 लाख डॉलर्स (सुमारे 7.5 कोटी रुपये) चा गंडा घातल्याचाही आरोप सिद्ध झाला आहे. त्याने या पैशातून आलिशान गाड्या, क्रिप्टोकरन्सी आणि महागडी ज्वेलरी खरेदी केली होती. न्यायालयाने जॉन हॅलफोर्डला 1,070,413 डॉलर्सचा दंड भरण्याचेही आदेश दिले आहेत. आपली तुरुंगवासाची शिक्षा ऐकण्यापूर्वी जॉन न्यायालयात उभा असताना आपली चूक कबूल करताना दिसला. तो म्हणाला, “मी हे अंत्यसंस्कार घर यासाठी सुरू केले होते की, मी लोकांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक करू शकेन. पण सगळे काही माझ्या हातून निसटले.”

advertisement

हे ही वाचा : भर रस्त्यात नवऱ्याला धू-धू धुतला; बायकोने दिली प्रियकराची साथ अन् बाईकवर बसून झाली फरार, वाचा सविस्तर...

हे ही वाचा : प्रेम होतं आईच्या प्रियकरावर, राहायचं होतं सोबत, मुलीने दिली सुपारी अन् नवऱ्याचा काढला काटा!

मराठी बातम्या/क्राइम/
व्यक्ती नव्हे, 'हा' तर हैवान! 191 मृतदेहांसोबत केले घृणास्पद कृत्य, इतकंच नाही राखेऐवजी द्यायचा सिमेंट!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल