हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आता लव्ह जिहादचे आरोप केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे नेते आणि प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी हा लव्ह जिहादचा प्रकार असू शकतो, अशी शंका व्यक्त केली असून, लव्ह जिहादच्या अनुशंगाने या हत्या प्रकरणाचा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
जालन्यातील रहिवासी असणारी विवाहित मोनिका दररोज ती कामानिमित्त संभाजीनगरला ये-जा करत होती. ती रेल्वे स्टेशनवर दुचाकी लावत असे. ती ज्या पार्किंगमध्ये दुचाकी लावायची, तिथेच इरफान शेख नावाचा तरुण काम करत होता. यातूनच दोघांमध्ये ओळख झाली. वर्षभरापासून दोघांचे संबंध जोडले गेले. दोघांमध्ये मोबाईलवर तासनतास बोलणं व्हायचं. यातूनच त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच प्रेमप्रकरणातून आता मोनिकाची हत्या झाली आहे.
घटनेच्या दिवशी 6 फेब्रुवारी रोजी मोनिका नेहमीप्रमाणे संभाजीनगर येथे ड्युटीवर गेली होती. पण रात्री उशिरापर्यंत त्या जालन्यात घरी परत आल्या नाहीत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मोनिका यांच्या आईने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असता त्यांना आरोपी इरफान शेख याच्यावर संशय आला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने मोनिकाच्या हत्येची कबुली दिली. शिवाय हत्येनंतर ज्याठिकाणी मृतदेह पुरला याची माहितीही त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता आरोपीच्या शेतातल्या एका पडक्या घरात मोणिकाचा मृतदेह विवस्त्र करून पुरलेल्या अवस्थेत आढळला आहे. आरोपीनं नेमकं कोणत्या कारणातून ही हत्या केली, याचं अधिकृत कारण अद्याप समोर आलं नाही. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून जालना पोलीस पुढील तपास करत आहेत.